Independence Day 15th August Flag Hoisiting Record: देशवासीयांसाठी मोठ्या गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. आपण यंदा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा (Independence Day) करत आहोत. यानिमित्ताने हर घर तिरंगा ही मोहिमसुद्धा देशभरात राबवली जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.  देशभक्तीची भावना आणि देशाप्रतीचे आपलं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमपासून परेडपर्यंत अनेक गोष्टींचं आयोजन राज्यात, शहारात, गावात, गल्ली-बोळ्यात केलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लाल किल्यावरून ध्वजारोहण करतील आणि देशवासीयांना संबोधित करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएम मोदी रचणार विक्रम
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग अकराव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सलग 10 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला होता. यंदाच्या 15 ऑगस्टला डॉ. मनमोहन सिंग यांना मागे टाकत पीएम नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर विक्रम रचतील. लालकिल्ल्यावर सर्वाधिक तिरंगा फडकावण्याचा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. नेहरू यांनी 17 वेळा लालकिल्ल्यावर ध्वजारोहण केलं होतं. तर इंदिरा गांधी यांच्या नावावर 16 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याचा विक्रम आहे.


 नेहरु यांनी 1947 ते 1963 दरम्यान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. तर इंदिरा गांधी यांनी 1966  पासून 1976 पर्यंत आणि 1980 ते 1984 पर्यंत सलग पाच वेळा एकूण 16 वेळा लाल किल्यावरून ध्वजारोहण करत देशवासीयांना संबोधित केलं. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी  2004 ते 2013 अशी सलग दहा वर्ष लालकिल्ल्यावर तिरंगा फडकावला. 


18 हजार लोकांना आमंत्रण
यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने 18 पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. यात महिला, शेतकरी, युवा आणि गरीब वर्गातील लोकांचाही समावेश असणार आहे. याशिवाय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.