मुंबई : बऱ्याच चर्चा आणि तर्कवितर्कानंतर अखेर महिंद्रा एँड महिंद्राकडून कार प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली आहे. ही आनंदाची बातमी आहे, नव्या Thar SUV बाबतची. 'थार'च्या नव्या मॉडेलची बाजारात आणण्याची तारीख जाहीर करण्यासोबतच महिंद्राकडून एक व्हिडिओही सर्वांच्या भेटीला आणण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये नवी थार नेमकी कधी भेटीला येणार याची ताऱीख कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'थार'च्या मागील सर्व मॉडेल्सच्या तुलनेत या नव्या 'थार'मध्ये कम्फर्ट आणि सुरक्षिततेच्या निकषांवर जास्त भर देण्यात आलेला असेल अशी हमी महिंद्राकडून देण्यात आली आहे. या नव्या वाहनाची 'ऑफ रोड' क्षमता आणि डिझाईन यावरही विशेष लक्ष देण्यात आलं आहे. 


'हे नवं वाहन फक्त 'थार' प्रेमींसाठीच परवणी नसेल, तर एका अद्वितीय वाहनाची खरेदी करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांनाही आकर्षित करेल', असं महिंद्राकडून जारी करण्यात आलेल्या माहितीमध्ये म्हणण्यात आलं आहे. नेहमीच्या प्रवासापेक्षा ऑफ रोडिंगला प्राधान्य देणाऱ्यांना ही थार खऱ्या अर्थानं प्रेमात पाडणार हे नक्की. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या थारबद्दल बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. 




मागील मॉडेलच्या तुलनेत या नव्या 'थार'मध्ये चालकाच्या आसनामध्ये अधिक कम्फर्ट असेल. त्याशिवाय नवा डॅशबोर्ड, मीटर कन्सोल, नव्या ठिकाणी असणारं पॅसेंजर होल्ड हँडल, नवं स्टेअरिंग व्हील आणि आसनव्यवस्था हे या नव्या मॉडेलमधील आकर्षिणाचे विषय. तर मग, नवं वाहन खरेदी करायच्या विचारात असाल तर, या ठार वेड लावणाऱ्या 'थार'चा पर्याय विचारात घेण्यास हरकत नाही.