नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था (economy) सतत मजबूत होण्याचा परिणाम दिसून येत आहे. दरम्यान भारत (India) ब्रिटनला (Britain) मागे टाकत जगातील पाचव्या क्रमाकांवर अर्थव्यवस्था बनला आहे. आता भारतापुढे अमेरिका, चीन, जापान आणि जर्मनी या 4 मोठया अर्थव्यवस्था आहेत. (India became the 5th largest economy in the world  )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ष 2021 च्या शेवटच्या तीन महिन्यात भारताने ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य गाठले आहे. यंदा पहिल्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 13.5 टक्के दराने वाढलीय. एका दशकापूर्वी भारत सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत 11व्या क्रमांकावर होता. आणि मोठ्या अर्थव्यवस्थेंच्या रांगेंत ब्रिटनला पिछाडीवर टाकत भारत पुढे सरसावलाय आहे. येणाऱ्या काळात भारत, ब्रिटिश अर्थव्यवस्थेच्या तुलनेत आपली पकड जास्त मजबूत करेल असा अंदाज आहे..   


ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिकी डॉलरमध्ये केलेल्या गणनेनुसार २०२१ च्या शेवटच्या तिमाहीत भारताने इंग्लंडला मागे टाकले आहे. दुसरीकडे IMF च्या जीडीपी डेटानुसार भारताने २०२२ च्या पहिल्या तिमाहीत आपली वाढ मजबूत केली आहे. अंदाजानुसार, या वाढीसह भारत लवकरच वार्षिक आधारावर जगातील ५वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल.


भारताची अर्थव्यवस्था ब्रिटनपेक्षा किती मोठी


मार्च तिमाहीच्या अखेरीस IMF आणि डॉलर विनिमय दराने जारी केलेल्या आकडेवारीच्या आधारे ब्लूमबर्गने माहिती दिली आहे की नाममात्र रोखीत भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार ८५४.७ अब्ज डॉलर होता. तर याच कालावधीत त्याच आधारावर इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचा आकार ८१६ अब्ज डॉलर होता. तसेच आगामी काळात भारत ब्रिटिश अर्थव्यवस्थेविरुद्ध आपली धार मजबूत करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.


वाचा : वाढत्या महागाईत लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर


20 वर्षात 10 पटीने जीडीपीत वाढ


वार्षिक आधारावर भारताची अर्थव्यवस्था 31.7 ट्रिलियन डॉलरची आहे आणि इंग्लंडच्या मागे सहाव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा जीडीपी सध्या 3.19 ट्रिलियन डॉलर आहे. तर 7 टक्क्यांच्या अंदाजे वाढीसह भारत या वर्षीही वार्षिक आधारावर यूकेला मागे टाकण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे त्यानंतर चीन, जपान आणि जर्मनीचा क्रमांक लागतो. भारताच्या जीडीपीने गेल्या 20 वर्षांत 10 पट वाढ नोंदवली आहे.