Chandrayaan- 3 : भारताच्या चांद्रयान- 3 मिशननं आणखी एक यशस्वी टप्पा गाठला आहे. चांद्रयान- 3 ने चंद्राच्या चौथ्या ऑर्बिटमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रयान चंद्राच्या अगदी जवळच्या कक्षेत पोहचले आहे. आता चांद्रयान- 3 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. संपू्रण जगाचे लक्ष याकडे लागले आहे. भाराताची चांद्रयान- 3 मोहिम यशस्वी टप्पा गाठत असतानाच. मिशन मून स्पर्धा सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. कारण, रशियानंतर आता जपान देखील चंद्रावर यान पाठवणार आहे. जपानकडून मिशन मूनची घोषणा करण्यात आली आहे.


23 ऑगस्टला चांद्रयान 3 चंद्रावर उतरणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या दिवशी म्हणजेच 14 ऑगस्टला भारताच्या  चांद्रयान- 3 मोहिमेला बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे. 14 जुलै 2023 रोजी भाराताचे चांद्रयान- 3 अवकाशात झेपावले.  संपूर्ण भारतीयांसाी हा मोठा अभिमानाचा क्षण होता. श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून दुपारी बरोब्बर 2 वाजून 35  मिनिटांनी LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आलं.   महिन्याभरात चांद्रयान- 3 ने यशस्वी टप्पा गाठला आहे. चांद्रयान- 3 आता चंद्राच्या अगदी जवळ पोहचले आहे. 16 ऑगस्ट रोजी सकाळी साडे आठ वाजता आणखी एकदा चांद्रयान- 3 ची कक्षा बदलली जाणार आहे. Lunar Orbit Injection नंतर चांद्रयान- 3  चंद्रापासून 100 किमी अंतरावर आणले जाणार आहे. यानंतर लँडर आणि रोव्हरचे प्रॅपल्शन मॉड्यूल वेगळे केले जाणार आहेत. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान- 3 चे सॉफ्ट लँडिंग केले जाणार आहे. 


चंद्रयान-3 आधीच रशियाचे यान चंद्रावर उतरणार?


भारताच्या चंद्रयान-3 नंतर रशियानंही आपलं यान चंद्राच्या दिशेनं पाठवले आहे.   रशियानं 47 वर्षांनंतर पहिल्यांदाच चंद्रावर यान पाठवलंय.  11 ऑगस्ट रोजी रशियाचे Luna-25 हे यान अवकाशात झेपावले.  Luna-25 हे यान देखील चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चंद्रयान-3 आधीच रशियाचे यान चंद्रावर उतरेल असा दावा केला जात आहे.  


जपानचे यान चंद्राकडे झेपावणार


भारत आणि रशियापाठोपाठ आता जपानचे यान चंद्राकडे झेपावणार आहे. जपान आपले स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर पाठवणार आहे. 26 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी ६ च्या सुमारास जपानचे यान चंद्राकडे झेपावणार आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून या यानाचे प्रक्षेपण होणार आहे. जपानी स्पेस एजन्सीच्या H-2A रॉकेटमधून जपानचे यान अवकाशात पाठवले जाणार आहे. हे यान अतिशय स्लिम आहे. यामुळे ते निश्चित केलेल्या जागेवर अचूक लँंडिग करेल असा दावा केला जात आहे.