नवी दिल्ली : भारताविरोधात खुरापती रचणाऱ्या पाकिस्ताननं चीनशी हातमिळवणी करत पुन्हा एकदा एक मोठा कट रचला आहे. पाकिस्तान चीनला पाकव्याप्त काश्मीरमधील एक खोरं भेट स्वरुपात देणार असल्याचं कळत आहे. हे सर्व पाकिस्तान चीनकडे असणारं आपलं कर्ज फेडण्यासाठी करत असल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका नव्या मार्गानं कट रचत पाकिस्तान गिलगिट बालटिस्तान प्रांतातील  हुंजा खोरं (Hunza Valley) चीनला देण्याचा बेत आखत आहे. इतकंच नाही, तर इथं युरेनियम खनिजांसाठीच्या खोदकामासाठीही चीनला परवानगी देण्यात येणार आहे. 



ही घटना 1963 चीच पुनरावृत्ती करत आहे. जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये येणाऱ्या 5 हजार चौरस फूटांची शक्सगामची जमीन चीनला भेट स्वरुपात देण्यात आली होती. त्या जमिनीवर आजही चीनचाच ताबा आहे. (India china )


आता पुन्हा एकदा हुंजा खोऱ्यात चीनचं वर्चस्व येणार असल्याचं कळत असल्यामुळं स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (Pakistan)


स्थानिक मंत्र्यांना पाक सैनिकांकडून मारहाण... 
पाकिस्तान सरकारच्या या योजनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत हा विरोध दिवसागणिक वाढताना दिसत आगे. स्कर्दूमध्ये तर, स्थानिकांनी पाकिस्तानी सैन्य अधिकारी आणि त्यांच्या वाहनांवर दगडफेकही केली. 


सूत्रांच्या माहितीनुसार चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडोअरच्या नावावर सैन्याच्या जमिनीवर चीनकडून ताबा मिळवला जात असल्यामुळं स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या या निर्णयावर आता भारताकडून काही प्रतिक्रिया दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.