Amit Shah in Arunachal Pradesh चीननं पुन्हा एकदा अरुणाचल भागात कुरापती सुरुच ठेवल्याचं पाहिल्यानंतर या भूमिकेचा भारतानं कडाडून विरोध केला. ज्यामागोमाग सोमवारी देशाचे गृहमंत्री (Amit Shah) अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशातील सीमा भागाला भेट देत तिथं तैनात असणाऱ्या सैन्य पथकांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावाही घेतला. पण, भारतीय गृहमंत्र्यांनी उचललेलं हे पाऊल चीनला रुचलं नाही, आणि त्यांच्याकडून सदरील मुद्याचा विरोध करण्यात आला. (India China border dispute Amit Shah Visits Arunachal Pradesh Beijing gave negative reaction)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमधील परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते  Wang Wenbin यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार सीमाभागात वरिष्ठ भारतीय मंत्र्यांच्या या कृती शांतता आणि सुव्यवस्थेला अनुसरून नव्हती. इतक्यावरच न थांबता अरुणाचल प्रदेशातील Zangnan प्रांत चीनचं असल्याची बाब त्यांनी पुन्हा अधोरेखित करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. 


अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत थोडं... 


सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अरुणाचल प्रदेशातील सीमा भागात असणाऱ्या किबिथू या गावात 'Vibrant Village' उपक्रमाच्या उदघाटन सोहळ्यासाठी पोहोचले होते. इथं त्यांनी अनेक विकास कामांचा शुभारंभही केला. यावेळी भारतीय भूमीवर कोणीही करडी नजर टाकू शकत नाही, इतकंच काय तर भारताची एक इंच जमिनही कोणीच हिसकावू शकत नाही, ते दिवस गेले आता... असं इशारावजा वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. 


आणखी काय म्हणाले शाह? 


खुद्द प्रभू श्रीरामांनी अरुणाचल प्रदेशाला हे नाव दिलं. किंबहुना देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक लहान मुल अरुणाल प्रदेशाला सूर्याची पहिली किरणं पडणारा प्रदेश म्हणून ओळखतं असं म्हणत हा प्रांत म्हणजे जणू भारतमातेच्या मुकूटातील लखलखणारा मणी आहे असं म्हटलं. दिल्लीत असणाऱ्या नेतांच्या आळसावलेल्या आणि चुकीच्या दृष्टीकोनामुळं हा भाग आतापर्यंत वादाच्या विळख्या अडकला होता, इथं कट्टरपंथीयांचा प्रभाव होता. आज मात्र या सर्व गोष्टींचा नायनाट झाला आहे, असं ते म्हणाले.


हेसुद्धा वाचा : Gold Price: सरकारचा मोठा निर्णय ! आता यापुढे घरात इतकेच सोने ठेवू शकाल, अन्यथा...


यावेळी काँग्रेसवर निशाणा साधत जे त्यांनी 12 वर्षांच्या शासनकाळात करून दाखवलं नाही, ते मोदी सरकारनं करून दाखवल्याचं म्हटलं. काँग्रेस काळात देशाता पूर्वोत्तर भाग एक अशांत क्षेत्र म्हणून ओळखला जात होता. पण, आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'पूर्व की ओर देखो' या उपक्रमामुळं देशातील हे क्षेत्रही विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याची बाब प्रकाशात आल्याचं शाह म्हणाले.