मुंबई : गेल्या वर्षी गलवानमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमक आणि तणावामुळे दोन्ही देशांचे सैनिक पूर्व लडाखपासून ते ईशान्येपर्यंत भारत-चीन सीमेवर तैनात आहेत. हिमालयाच्या या भागात अशा अनेक आर्मीचे पोस्ट आहेत, जे खूप उंचावर आहेत आणि येथे सियाचीनसारखी परिस्थिती आहे. ज्यामुळे येथे खूप थंडी आहे. या सर्व विचित्र परिस्थितीतही भारतीय सैनिक चिनी सैन्याचा प्रत्येक घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात गुंतले आहेत, मात्र चिनी सैनिकांना येथे राहणे कठीण होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनने या भागात आपले सैन्य तैनात केले असले तरी पीएलएच्या सैनिकांना अशा भागात कर्तव्य बजावण्याची सवय नाही आणि गेल्या वर्षभरात अनेक चिनी सैनिकांचा थंडी आणि इतर आजारांमुळे मृत्यू झाला आहे. हिमालयाच्या या भागात अशी अनेक ठिकाणे आहेत, खूप उंचीवर असल्याने येथे ऑक्सिजनची कमतरता आहे, ज्यामुळे सैनिकांना श्वास घेणे कठीण होते.


चीन आता या भागात तैनातीसाठी जाणाऱ्या प्रत्येक सैनिकाला खास पोर्टेबल-ऑक्सिजन पुरवठा करणारी उपकरणे देत आहे. जेणेकरून त्यांचे सैनिक अशा भागात दीर्घकाळ ड्युटी करू शकतील.


गलवानमध्ये भारत-चीन सैन्यादरम्यान झालेल्या चकमकीनंतर चीनने भारताच्या सीमेजवळ शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे तैनात करण्याबरोबरच आपल्या सैन्याची संख्या वाढवली आहे. भारत-चीन सीमा असो किंवा सियाचीनचे उंच शिखर, अशा भागात तैनाती करण्याचा भारतीय सैनिकांना जुना अनुभव आहे, परंतु हे सर्व चिनी सैनिकांसाठी पूर्णपणे नवीन आहे.


यामुळेच या भागात चिनी सैन्यांना तग धरुन बसणे कठीण होत आहे. ज्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे. परंतु आपले भारतीय सैनिक आपल्या कर्तव्यावर तत्पर आहेत, ते अशा परिस्थितीत देखील स्वत:ला आहे त्या परिस्थिती कर्तव्य बजावण्यासाठी तयार आहेत, त्यांच्या या देश प्रेमापुढे ही नैसर्गिक आपत्ती देखील टिकू शकत नाही.


मागील वर्षी 15 जून 2020 रोजी पूर्व लडाखमधील गलवान येथे चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत अनेक चिनी सैनिक मारले गेले होते, तसेच भारतीय सैन्याच्या 20 जवानांनी देशासाठी  बलिदान दिले होते. चीनचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कराने M777 तोफा, चिन्हूक्स आणि अनेक क्षेपणास्त्रेही तैनात केली गेली आहेत.