Video : दे धपाधप ! घुसखोरी करताना चिनी सैनिकांवर भारतीयांकडून लाठ्यांची बसरता, काय आहे सत्य?
Fact check : चीननं (China) पुन्हा एकदा भारतावर (India) कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) तवांग सीमेवर (Tawang Border) भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली. या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
India-China Soldier Viral Video : भारत आणि चीन सीमावाद (India and China Border) हा काय नवीन विषय नाही. चीन सैनिक अनेक वेळा भारतीय सीमेत घुसखोरी करतानाचा घटना समोर आल्या आहेत. चीन सैनिकांनी पुन्हा एकदा भारतीय सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. ही घटना 9 डिसेंबरला तवांगमध्ये (Tawang) घडली. यावेळी भारत आणि चीनचे जवळपास 300हून अधिक सैनिक एकमेकांशी भिडले. या झटापटीमध्ये 30 सैनिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. या झटापटाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (India-China Soldier Viral Video) होतो आहे.
दे धपाधप ! चीन सैनिकांवर लाठ्यांचा मारा
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करत असताना भारतीय सैनिक त्यांचावर तुटून पडले. कोंबडी बकऱ्यांना काठ्यांनी जसं बदडून बदडून हकलतात तशी अवस्था या चीनी सैनिकांची झाली. भारतीय सैनिकांच्या लाठीच्या प्रसादामुळे चीनी सैनिकांच्या नाकीनऊ आणलं होतं. भारतीय सैनिकांचं रौद्ररुप पाहून सैनिक उलट्या पावले परत गेली. त्यानंतर भारतीय सैनिकांचा जल्लोष या व्हिडिओमध्ये दिसतं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो आहे. (India-China Soldier Viral Video Fact check indian soldiers beating chinese soldiers latest Trending Video )
व्हिडिओ मागील सत्य
शिव आरूर आणि आदित्य राज कौल यांच्यासह अनेक पत्रकारांनी खुलासा केला की हे व्हिडिओ तवांगमधील भारत-चीन चकमकीचे आहेत. मात्र हा व्हिडिओ जुना आणि गलवान 2020 नंतरचा असू शकतो.हा व्हिडिओ कधीचा आहे हे स्पष्ट नसले तरी तो 9 डिसेंबरच्या घटनेचा नाही, असं सांगण्यात येतं आहे.
आणखी एका ट्विटर वापरकर्ता मेजर अमित बन्सल (निवृत्त) आणि भू-रणनीती तज्ज्ञ यांनी म्हटलं आहे की, हा जुना व्हिडिओ आहे कारण अलीकडील चकमकी झालेल्या यांगत्झीच्या आसपासचा भागात बर्फाळ राहतो.
दरम्यान तवांगमध्ये मार खावून चिनी माघारी गेले असले तरी एक मात्र नक्की. कुरापतखोर चीन शांत बसणार नाही. गलवान संघर्षानंतर सलग 30 महिने भारताला पूर्व लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करावं लागतंय. आता तशीच वेळ तवांगसारख्या अतिदुर्गम भागातही आली तर भारतासाठी ही मोठी डोकेदुखीच असेल. पण ड्रॅगनला कसं ठेचायचं हे भारताला चांगलंच ठाऊक आहे.