मुंबई :  भारतात गेल्या २४ तासांमध्ये ८६ हजार ४३२ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ४० लाख २३ हजार १७९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर  ६९ हजार ५६१ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ८ लाख ४६ हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरू असून ३१ लाख ७ हजार ५६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  



दरम्यान कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी तसंच राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी खास नवी मोहीम राबण्यात येणार आहे. 


ही मोहीम पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान तर दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.