देशात कोरोना रुग्ण संख्या ५ लाखांवर; गेल्या २४ तासात धक्कादायक वाढ
देशात आतापर्यंत 15685 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या 5 लाखांवर पोहचली आहे. देशात कोरोना रुग्णांचा आकडा 5,08,953वर गेला आहे. गेल्या 24 तासात 18 हजार 552 नवे कोरोना रुग्ण आढळले आहे. तर 384 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसात 10244 रुग्ण बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत 15685 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 1,97,387 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 2,95,880 लोक आतापर्यंत कोरोनातून बरे झाले आहेत.
दिल्लीत गेल्या 24 तासांत 3460 नवे रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसांत 63 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या 77000वर गेली आहे. तर दिल्लीत 2492 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या मुंबईत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 1297 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 72287वर पोहचील आहे. मुंबईत 4177 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर आतापर्यंत 39,744 रुग्ण बरे झाले आहेत.
एकीकडे देशातील रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे देशातील रुग्णांचा रिकव्हरी रेट सुधारणं ही काहीशी दिलासादायक बाब आहे. रिकव्हरी रेट वाढून तो 58.13 टक्क्यांवर पोहचला आहे.