Shocking Video : आरोग्याची पोलखोल करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमुळे सरकारी आरोग्य यंत्रणेचे (Government Health Systems) केस तीन तेरा वाजले आहे, याचं विचारक चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. एका सरकारी आरोग्य रुग्णालयात डॉक्टरच्या उपस्थितीत चक्क जनरेटर दुरुस्त (Generator Operator) करणारा रुग्णावर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
बिहारमधल्या (Bihar) पूर्णिया जिल्ह्यातल्या सरकारी रुग्णालयातील (Government Hopital) ही घटना आहे. इथल्या भवानीपूर सामुदायिक स्वास्थ केंद्राचे डॉक्टर मृगेश कुमार हे प्रभारी आहेत. रस्ते अपघातात जखमी झालेल्या एका रुग्णाला (Patient) उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णाची परिस्थिती गंभीर होती. याबाबत डॉक्टर मृगेश यांना माहिती देण्यात आली. त्या रुग्णावर उपचार सुरु करण्यात आले, पण धक्कादायक म्हणजे ते उपचार रुग्णालतील जनरेटर दुरुस्त करणारा मॅकेनिक करत होता. तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये याचा व्हिडिओ तयार केला. (Video Record on Mobile)


ज्या वेळी जनरेटर ऑपरेटर रुग्णावर उपचार करत होता, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले डॉक्टर मृगेश आपल्या मोबाईमध्ये व्हिडिओ बघत होते. काही दिवसांपूर्वीच भवानीपुर रुग्णालयाच्या निरिक्षणावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर आदेश दिले होते. रुग्णालयात कोणताही निष्काळजीपणा नको, तसंच रुग्णांना प्रत्येक सुविधा देण्यात याव्यात असे आदेश  देण्यात आले होते. 


विरोधी पक्षांची टीका
व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. स्थानिक जेडीयू नेता कृष्ण कुमार गुप्ता यांनी घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. इथल्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे प्रकार होत असल्याचा आरोप कृष्ण कुमार गुप्ता यांनी केला आहे. जिल्ह्यातील अनेकांनी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका व्यक्तीच्या आईची तब्येत बिघडल्याने त्याने रुग्णालयात फोन केला, पण रुग्णालयात डॉक्टरच उपस्थित नव्हते. याबाबत रुग्णालयात विचारण्यात आलं तर त्या व्यक्तीला शिविगाळ करण्यात आली.


हे ही वाचा : Viral Video : इथे ओशाळली माणूसकी! Reels बनवण्यासाठी कुत्र्याच्या पिल्लाच्या जीवाशी खेळ, संतप्त प्रतिक्रिया


प्रकरणाच्या चौकशीचे आदेश
याप्रकरणी पूर्णियाचे सिविल सर्जन डॉ. अभय प्रकाश चौधरी यांनी व्हिडिओबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, पण याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकरणाचा सखोल अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले असून बेजबाबदारपणा आढळला तर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं डॉ. अभय प्रकाश चौधरी यांनी म्हटलं आहे.