SIPRI report : भारतीय सीमाभागात एकिकडे पाकव्याप्त (POK) काश्मीरमधून (Kashmir) सातत्यानं देशात घुसखोरीचा प्रयत्न केला जात असताना दुसरीकडे, (China) चीनच्या खुरापतीसुद्धा अडचणी वाढवताना दिसत आहेत. देशातील हे एकंदर चित्र पाहता आता काहीशी चिंता वाढवणारी माहितीसुद्धा समोर आली आहे. कारण, विविध देशांकडे असणाऱ्या अण्वस्त्र साठ्यासंदर्भातील माहिती एका अहवालातून समोर आली असून, यामध्ये चीन आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SIPRI report मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार चीनच्या आण्विक शस्त्रांचा साठा जानेवारी 2023 मध्ये 410 इतका होता. जो, जानेवारी 2024 मध्ये 500 वर पोहोचला आहे. यामध्ये सातत्यानं बर पडत असल्याचा खुलासा इथं झाला. यामध्ये भारताकडे पाकिस्तानच्या तुलनेत अधिक शस्त्रसाठा असून, चीन मात्र या दोन्ही देशांच्या बराच पुढे असल्याचं स्पष्ट होत आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पिस रिसर्च इन्स्टीट्यूट अर्थात सिप्रीकडून सोमवारी ही आकडेवारी जारी करण्यात आली. 


अहवालातील काही महत्त्वाचे मुद्दे लक्ष देण्याजोगे... 


- अमेरिका, रशिया, युके, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्रायल या देशांकडून सातत्यानं अण्वस्त्रसज्ज शस्त्रसाठ्यावर भर दिला जडात असून, 2023 मध्ये या देशांनी अत्याधुनिक तंत्रांना प्राधान्य दिलं. 


- भारताच्या आण्विक शस्त्रसाठ्याविषयी सांगावं तर, जानेवारी 2024 मध्ये ही आकडेवारी 172 इतकी होती. तर, पाकिस्तानमध्ये ही आकडेवारी होती 170. 


- भारताला पाकिस्तानकडून असणारा धोका लक्षात घेत अधिक दूरपर्यंत मारा करणाऱ्या आण्विक शस्त्रांच्या निर्मितीवर भारताचा भर दिसून येत आहे. यामध्ये भेदक क्षमता चीनपर्यंत असण्याचे निकष महत्त्वाचे आहेत. 


- सध्याच्या घडीला देशात 2100 सक्रिय बॅलिस्टीक मिसाईल तैनात असून, त्यापैकी बहुतांश क्षेपणास्त्र रशिया आणि चीनचे असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये चीननंही सतर्कता लक्षात ठेवत बॅलिस्टीक क्षेपणास्त्र तैनात ठेवल्याचं सांगितलं जात आहे. 


- जगभरात रशिया आणि अमेरिकेकडे मिळून जवळपास 90 टक्के अण्वस्त्रसाठा आहे. 


कोणत्या देशात किती अण्वस्त्रसाठा? 


देश अण्वस्त्रसाठा
रशिया  5580
अमेरिका   5044
चीन  500
फ्रान्स  290
ब्रिटन  225
भारत  172 
पाकिस्तान  170
इस्रायल  90
उत्तर कोरिया  50
एकूण आकडेवारी  12121

 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं 


आण्विक शस्त्रांसंदर्भात भारत कोणत्या स्थानी? 


आण्विक शस्त्रांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या पहिल्या काही राष्ट्रांच्या यादीत भारताचं स्थान सहावं असून, सिप्रीच्या अहवालानुसार, भारत, पाकिस्तान आणि उत्तर कोरियामध्ये एकाच क्षेपणास्त्रावर अनेक अण्वस्त्र तैनाकत करण्याच्या तंत्रावर अधिक भर दिला जात आहे. अमेरिका, रशिया आणि चीनच्याच पावलावर  ही राष्ट्र पाऊल टाकताना दिसत आहेत. येत्या काळात ही राष्ट्र जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष्यभेद करण्यावर भर देऊ शकतात असं म्हटलं जात आहे.