मुंबई : कुणीतरी येणार येणार याची तयारी भारतीयांनी एवढी जोरदार केली होती की, वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२० ला भारतात तब्बल ६७ हजार ३८५ बाळांचा जन्म झाला आहे. जगात वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक बाळांचा जन्म भारतात झाला आहे. भारतातनंतर चीन आणि नायजेरिया या देशांमध्ये सर्वाधिक बाळांचा जन्म झाला.


कोणत्या देशात किती बाळांचा जन्म 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. चीन - ४६ हजार २९९
२. नायजेरिया - २६ हजार ०३९
३. पाकिस्तान - १६ हजार ७८७
४. अमेरिका - १० हजार ४५२


नववर्षाच्या पहिल्या दिवशी इतक्या बाळांचा जन्म झाला आहे. २०२० च्या पहिल्या बाळाचा जन्म फिजीत तर शेवटच्या बाळाचा जन्म अमेरिकेत झाला. १ जानेवारीला बाळ जन्माला यावं म्हणून अनेक जोडप्यांनी सिझेरियन करुन बाळाला जन्म देण्याचं ठरवलं होतं. जगात बऱ्याच देशांमध्ये हा ट्रेण्ड आहे. 


असं असलं तरी आणखी एक कटु सत्य म्हणजे गेल्या वर्षी वर्षाच्या पहिल्याच दिवशी जगभरात पंचवीस लाख बाळांचा विविध कारणांनी मृत्यू झाला होता. जन्माच्या अवघ्या महिनाभरात तब्बल २५ लाख बाळं दगावली. बाळांची नीट काळजी न घेतल्यानं बऱ्याच बालकांचा मृत्यू होतो. पण गेल्या तीस वर्षांपासून अर्भक मृत्यू दरात लक्षणीय घट झाली आहे. तीन वर्षांत नवजात अर्भकं दगावण्याची संख्या निम्म्यानं घटली आहे. त्यासाठी युनिसेफ मोहिमा राबवत आहे. पण त्यासाठी प्रत्येकानंच आपापल्या परीनं एक पाऊल पुढे टाकायला हवं.