मुंबई : कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन जागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे हाल होत आहे. अनेक जण कोठे ना कोठे अडकून पडले आहेत. तसेच परप्रांतीय मजूर गावी परतण्यासाठी धडपड करत आहेत. रेल्वेकडून आधी स्पेशल श्रमिक रेल्वे चालविण्यात आल्या आणि येत आहेत. तसेच रेल्वे रुळावर आणण्यासाठी प्रयत्न होत असताना परराज्यात जाण्यासाठी रेल्वे १ जूनपासून सुरु धावणार आहे. या गाड्या आता कोणत्या स्थानकावर थांबणार आहेत, त्याची यादी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ही यादी प्रवाशांना पाहणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना दुसऱ्याच स्थानकावर उतरावे लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पुढील सोमवारपासून भारतीय रेल्वे २०० अतिरिक्त गाड्या चालवणार आहे. परंतु अद्यापही प्रश्न आहे की ज्या गाड्या चालवल्या जातील त्या तुमच्या घराजवळील स्टेशनवर थांबतील की नाही. म्हणून आम्ही येथे तुम्हाला खास ट्रेनची सारी माहिती सांगत आहोत, जेणेकरून तुम्हाला तिकीट आरक्षण करताना त्रास होणार नाही.



उत्तर रेल्वेने दिल्लीतून जाणाऱ्या सर्व गाड्यांचा तपशील सार्वजनिक केला आहे. या गाड्यांचा तपशील आता पाहता येईल. या सर्व विशेष गाड्या १ जूनपासून सुरू होण्यास रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे. तसेच रेल्वे स्थानकांमधील गर्दी आणि सुरक्षा पाहता फेस मास्क वापरण्याची माहिती रेल्वेने दिली आहे. तसेच सामाजिक अंतराचे अनुसरण करण्यास सांगितले आहे.


या व्यतिरिक्त रेल्वे मंत्रालयाने असे म्हटले आहे की आता प्रवासी आरक्षणासाठी १२० दिवस अगोदर म्हणजेच चार महिन्यांत तिकिट बुक करू शकतात. सध्या रेल्वेने प्रवाशांना अवघ्या एक महिन्यापूर्वीच आगाऊ बुकिंगची सुविधा दिली आहे. नवीन नियम ३१ मे रोजी सकाळपासून लागू होईल.



स्थानिक रेल्वे विभागानेही उत्तर प्रदेशमधून जाणाऱ्या प्रवाशांची यादी जाहीर केली आहे. या सर्व गाड्या उत्तर प्रदेशमधील स्थानकांवर थांबाणार आहे.