India Pakistan Clash in UN : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये उडणारे खटके नवे नाहीत. पण, यावेळी मात्र निमित्त वेगळं आहे. सोशल मीडियावर एका महिला अधिकाऱ्यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. जिथं त्या पाकिस्तानला खडे बोल सुनावताना दिसत आहेत. दहशतवाद आणि पाकिस्तान या मुद्द्यांवर भाष्य करताना कटकारस्थानं रचणाऱ्या शेजारी राष्ट्राचा खरा चेहरा जगासमोर आणणाऱ्या या महिला अधिकाऱ्यांनी मांडलेले मुद्दे पाहता, त्यावर उत्तर देणं पाकिस्तानला जमलंच नाही. पण, संयुक्त राष्ट्रासारख्या जागतिक मंचावर मर्यादा ओलांडल्यास काय उत्तर मिळतं, हेसुद्धा यामुळं त्यांच्या लक्षात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या वतीनं संयुक्त राष्ट्रंघाच्या महासभेतील जनरल असेंबली (UNGA) येथे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या भाषणानंतर शेजारी राष्ट्राला खडसावण्यात आलं. सीमाभागात सुरु असणाऱ्या दहशवादाला पाकिस्ताननं कायम समर्थन दिलं आहे आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील अशा शब्दांत भारताकडून पाकवर टीका करण्यात आली. न सुधारणाऱ्या पाकिस्तानच्या वतीनं पंतप्रधान शरीफ यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा अधोरेखित केला, ज्यावर भारताकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 


हेसुद्धा वाचा : कर्ज घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी; बँकांच्या एका निर्णयामुळं रिकामं होईल खातं? 


संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या प्रथम सचिव म्हणून नियुक्त असणाऱ्या प्रथम सचिव भाविका मंगलनंदन यांनी जागतिक स्तरावरील दहशतवादामध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्यातं म्हणत त्यांच्याकडून कायमच सीमाभागातील दहशतवादातचं समर्थन करण्यात आल्याची बाब स्पष्ट केली. पाकच्या पंतप्रधानांकडून अनुच्छेद 370 आणि तत्सम मुद्द्यांवर भाष्य केलं गेल्यानंतर त्यांचं हे वक्तव्य अतिशय निराशाजनक असल्याचं ठाम मत मंगलनंदन यांनी मांडलं. दहशतवाद, अंमली पदार्थांचा व्यापार आणि आंतराष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारीसाठी जागतिक स्तरावर ख्याती असणाऱ्या एका देशानं (पाकिस्ताननं) जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रावर हल्ला करण्याचं धाडस केलं, पाकिस्तान प्रत्यक्षात काय आहे हे सारं जग पाहू शकतं अशा शब्दांत भारताच्या वतीनं बोचऱ्या शब्दांसह टीकेची झोड उठवण्यात आली. 


पाहा संपूर्ण प्रतिक्रिया... 



संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या वतीनं पाकिस्तानला उधळून लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही वर्षांपूर्वी देशाच्या परराष्ट्रमंत्रीपदी असणाऱ्या एस जयशंकर यांनीही पाकिस्तानहा दहशतवाद्यांचे हितचिंतक म्हणून संबोधलं होतं. गतकाळात भारतात पुलवामा आणि तत्सम हल्ल्यांसाठी पाकिस्तानला खडसावत जागतिक स्तरावर हा अतिशय गंभीर मुद्दा असल्याची बाब अधोरेखित केली होती.