Pawan Cheetah Died : मध्य प्रदेशमधल्या कूनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) आणखी एका चित्याचा (Cheetah) मृत्यू झाला आहे. दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून आणलेल्या चित्यांपैकी आतापर्यंत 13 चित्यांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या चित्याचं नाव पवन (Pawar Cheetah) असं होतं. वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पवन याला नामिबियातून (Namibia) आणण्यात आलं होतं. त्याला कूनोच्या जंगलात मोकळं सोडण्यात आलं होतं. मंगळवारी जंगलातील एका नाल्यात पवन चित्याचा मृतदेह आढळला. पावसामुळे नाल्यात ओंसडून पाणी वाहत होतं. यातच पवन चित्याचा बुडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. पवन चित्याचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टेंमच्या रिपोर्टनंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल. काही दिवसांपूर्वीच चित्याच्या एका छाव्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कूनो नॅशनल पार्कात पवन हा एकुलता एक नर चिता होता. पवन चित्याला जंगलात मोकळ सोडण्यात आलं होतं. जंगलात पवनच्या सर्व हालचालींवर वन विभागाकडून नजर ठेवली जात होती. मंगळवारी जेव्हा पवनचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं त्यावेळी बराच वेळ पवनची कोणतीची हालचाल दिसली नाही. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहून पाहणी केली. 


नाल्यात सापडला मृतदेह
कूनो नॅशनल पार्कमध्ये असेल्या एका नाव्यात पवन चित्याला मृतदेह आढळला. वन अधिकाऱ्यांनी शोध घेतला त्यावेळी पवन निपचित पडला होता. त्याची कोणतीच हालचाल होत नव्हती. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मुसळधार पावसामुळे जंगलातील नाला पूर्णपणे भरला होता. प्राथमिक अंदाजानुसार पवनचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यत आला आहे. पवनच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. 


आतापर्यंत तेरा चित्यांचा मृत्यू
कूनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत 13 चित्यांचा मृत्यू झाला आहे. यात 8 वयस्क आणि 5 छाव्यांचा समावेश आहे. 5 ऑगस्टलाच एका छाव्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मादी चिता गामिनीने मार्च महिन्यात 6 छाव्यांना जन्म दिलाहोता. त्याचवेळी एका छाव्याचा मृत्यू झाला. आता पाच ऑगस्टला आणखी एका छाव्याचा मृत्यू झाला. 


20 चिते भारतात
प्रोजेक्ट चिता अंतर्गत 17 सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून 8 आणि दक्षिण आफ्रिकेतन 12 चिते कूनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले. एकूण 20 चिते विशेष विमानाने भारतात आणण्यात आले. यातल्या नामिबियातून आणलेल्या ज्वाला नावाच्या मादी चित्याने 24 मार्चला कुनो नॅशनल पार्कमध्ये 4 बछड्यांना जन्म दिला. यातल्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला होता.