`भारताची डोकलाममधून माघार`
`भारतानं वादग्रस्त डोकलाम भागातून माघार घेत आपल्या सैन्याच्या संख्येत घट केलीय` असा दावा चीनी सरकारनं केलाय.
नवी दिल्ली : 'भारतानं वादग्रस्त डोकलाम भागातून माघार घेत आपल्या सैन्याच्या संख्येत घट केलीय' असा दावा चीनी सरकारनं केलाय.
इकोनॉमिक टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार, १५ पानांचा एक अहवालच चीनच्या परदेश मंत्रालयानं सादर केलाय. डोकलामच्या सीमेवर जिथे अगोदर ४०० भारतीय सैनिक होते तिथे आता केवळ ४० सैनिक उपस्थित असल्याचं या अहवालात म्हटलंय
'१६ जून २०१७ रोजी चीननं डोकलाम भागात रस्ता बनवण्याचं काम हाती घेतलं... १८ जून रोजी २७० हून अधिक भारतीय सैनिक तिथं उपस्थित झाले आणि काम थांबवताना ते चीनच्या सिमेत १०० मीटरपर्यंत आतमध्ये घुसले... एका वेळेला तिथं ४०० भारतीय सैनिक उपस्थित झाले होते... जुलैच्या शेवटपर्यंत तिथ ४० भारतीय सैनिक आणि एक बुलडोझर अवैधरित्या चीनच्या सीमेत आहे' असा दावा चीननं केलाय.
चीनचा हा दावा भारतानं मात्र फेटाळून लावलाय. भारतीय सेनेचे जवळपास ३५० सैनिक अद्यापही डोकलाममध्ये सज्ज आहेत, असं भारतानं म्हटलंय.