PM Narendra Modi In Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला लोकांची पसंती मिळतेय. या व्हिडिओ देशाचे पंतप्रधान लहान विद्यार्थ्यांमध्ये रमलेले पाहिला मिळतायत. पंतप्रधान मोदींनी आज लहान विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी छान गप्पागोष्टी केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तविक भारतात नवीन शैक्षणिक धोरण  (National Education Policy) लागू होऊन तीन वर्षे झाली आहेत. त्यानिमित्ताने दिल्लीत अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झालं होते, त्यांनी लहान मुलांची भेट घेतली आणि तिथलं प्रदर्शनही पाहिलं. दिल्लीतील प्रगती मैदानावर होणाऱ्या अखिल भारतीय शिक्षण परिषदेचा (all india education conference) हा  कार्यक्रम दोन दिवस चालणार आहे.


लहान मुलांशी गप्पा
या प्रदर्शनावेळी पंतप्रधान मोदी यांनी तिथल्या लहान मुलांच्या एका कार्यशाळेला भेट दिली. यावेळी लहान मुलांनी अक्षरश: त्यांना घेरलं. मोदी जी नमस्ते म्हणत मुलांनी त्यांचं स्वागत केलं. मग पीएम मोदींनीही मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मुलं काय करतायत याची माहिती त्यांनी करुन घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मुलांना एक मजेशीर प्रश्न केला. 


काही मुलांनी पीएम मोदींना मिठीच मारली. यावेळी पंतप्रधानांनी मुलांना तुम्ही मोदींना ओळखता का असा सवाल विचारला. यावर एका मुलाने मी तुम्हाला टीव्हीवर बघितलंय असं उत्तर दिलं. तर एका मुलाने आम्ही तुमचा फोटो पाहिल्याचं मनोरंजक उत्तर दिलं. एका मुलाने तुम्हाला भाषण देताना पाहिल्याचं सांगितलं. 


या गप्पागोष्टींचा एक छोटासा व्हिडिओ पीएम मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी एक कॅप्शनही दिलंय. निरागस मुलांसोबतचे काही आनंदाचे क्षण! त्यांची ऊर्जा आणि उत्साह मनाला मोहून टाकते, असं पीएम मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. पंतप्रधान मोदींना भेटल्यावर मुलं खूप खुश झाल्याचं या व्हिडिओत पाहिला मिळतंय. यावेळी पीएम मोदी यांनी मुलांनी बनवलेली पेटिंगही पाहिली. त्यांनी मुलांना रंगाची नावं विचारली. 



कार्यक्रमाच्या समारोपत पीएम मोदी यांनी केलेल्या भाषणात शिक्षणात झालेल्या आमुलाग्र बदलावर चर्चा केली.  2020  मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर तीन वर्षांनी पंतप्रधान मोदींनी देशभरातील शिक्षणाशी संबंधित सर्व बुद्धिजीवींचे आभार मानले. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी शिक्षणात प्रादेशिक भाषांना प्राधान्य देण्याची सूचना केली आणि नजीकच्या काळात 22 प्रादेशिक भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित केली जातील असंही त्यांनी सांगितलं.