पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या पगाराची नोकरी, 10 वी पास उमेदवार करु शकतो अर्ज
Post Office Recruitment 2023 : भारतीय पोस्ट कार्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पोस्ट ऑफिसमधील रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. तुम्ही 10वी पास असाल तर त्वरीत अर्ज करा.
India Post GDS Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ही नोकरीची संधी आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी 10वी उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करु शकतात. ही भरती प्रक्रिया सुरु झाली असून या पदांसाठी त्वरित अर्ज भरा. त्यासाठी संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या.
पोस्ट ऑफिसमध्ये 10वी पास तरुणांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळविण्याची सर्वोत्तम संधी आहे. कारण भारतीय पोस्ट कार्यालयाने बंपर भरती सुरु केली आहे. पोस्ट ऑफिस शाखा कार्यालयामध्ये (BO) ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्ट मास्टरसाठी (ABPM) रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या सर्व पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरु शकता.
या महत्त्वाच्या तारखांकडे लक्ष द्या !
पोस्ट कार्यालयातील या भरतीसाठी 22 मे पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 11 जून 2023 पर्यंत वेळ आहे. 12 जून ते 14 जून 2023 या कालावधीत उमेदवारांना अर्जामध्ये सुधारणा करण्याची संधी दिली जाईल.
नोकरीचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती?
भारतीय पोस्टात GDS भरती 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गाला नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जात आहे.
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता
अर्जदाराने मान्यताप्राप्त मंडळाचा दहावी पास असणे आवश्यक आहे. तसेच त्याने अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून गणित आणि इंग्रजीसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असावे.
किती आहे वेतन ?
शाखा पोस्टमास्टरच्या (BPM) पदांवर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 12,000 ते 29,380 रुपये वेतन मिळेल. तर सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM) पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 10,000 ते 24,470 रुपये पगार मिळेल.
अर्ज कसा करायचा, यालील प्रमाणे टिप्स फोलो करा
- प्रथम अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in जा
- आता भरती सूचना लिंकवर क्लिक करा.
- अर्ज भरण्यासाठी पुढे जा.
- आता नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्जातील तपशीलांची पडताळणी करा.
- विहित अर्ज फी भरा.
- त्यानंतर अर्ज सबमिट करा.
- फॉर्मची प्रिंटआउट काढा आणि ती तुमच्याकडे ठेवा.