Indian Railway : वातावरणात आलेला गारवा आणि एकंदरच सध्याचे दिवस पाहता तुमच्यापैकी अनेकजण एखाद्या ठिकाणी सहलीला जाण्यासाठीचा बेत आखत असतील. कुठे जायचं इथपासून सुरु झालेली प्रश्नांची रांग मग खर्च किती येणार इथपर्यंत येऊन थांबते. तुम्हीही अशाच प्रश्नांच्या गोंधळात असाल, तर भारतीय रेल्वे (Indian Railway) तुमच्या या प्रश्नांची उत्तरं सज्ज आहे. कारण, एका अविस्मरणीय ठिकाणाला भेट देण्याची संधी IRCTC देत आहे.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ठिकाण म्हणजे राजस्थान (Rajasthan). ऐतिहासिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि कलात्मकतेचा आशीर्वाद असणाऱ्या या ठिकाणी जाण्यासाठी IRCTC नं एक जबरदस्त टूर पॅकेज(IRCTC special air tour package) लाँच केलं आहे. ज्यामधून तुम्हाला 8 रात्री आणि 9 दिवस राजेशाही थाटात फिरता येणार आहे. राजस्थानच्या या सफरीवर तुम्ही बिकानेर (Bikaner), जयपूर (jaipur), जैसलमेर (Jaisalmer), जोधपूर (jodhpur), उदयपूर (Udaipur) या ठिकाणांना भेट देऊ शकता. (India Railway IRCTC offers to visit rajasthan in a royal way read all tour package details )


Royal Rajasthan चा आनंद घेण्याची हीच सुवर्णसंधी 


राजस्थानचा प्रत्येक भाग, प्रत्येक परिसर तुम्हाला वेगवेगळे अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. रॉयल राजस्थान (Royal Rajathan) पॅकेजमधून तुम्हाला हे सर्व अगदी सहजपणे अनुभवता येणार आहे. यामध्ये इतिहासात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या महाल, राजवाड्यांपासून विविध संग्रहालयं आणि किल्ल्यांचा समावेश आहे. 


अधिक वाचा : तब्बल 561 दिवस, 4492 तास आणि 17 देश; 'हा' आहे जगातील सर्वात लांब रस्ता


सुरेख अशा तलावांपासून वाळवंटीय प्रदेशातील राहणीमानाचा अनुभवही तुम्हाला यातून घेता येणार आहे. गतकाळातील वैभव (heritage), लोककला (Folk art), स्थानिक राहणीमान (Local Lifestyle), खाद्यसंस्कृती (food Culture) आणि अशा बऱ्याच नवनवीन गोष्टींना अनुभवण्याची संधी भारतीय रेल्वेच्या या पॅकेजमधून तुम्हाला मिळणार आहे. 


कसा असेल प्रवास, किती होईल खर्च? 


IRCTC च्या या पॅकेजमध्ये तुम्हाला विमान प्रवासाचं तिकीट, सर्व ठिकाणांवर एसी कोचनं ने-आण करण्याचा खर्च, प्रेक्षणीय स्थळांना भेट देणं, तिथं खाणं-पिणं, डिलक्स हॉटेलमध्ये मुक्काम आणि City Tours चा खर्च समाविष्ट असेल. या पॅकेजसंदर्भातील माहिती देणारं एक ट्विटही रेल्वेकडून करण्यात आलं आहे. ज्यामध्ये माणसी 40,700 रुपये इतका खर्च येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याबाबतची आणखी सविस्तर माहिती तुम्हाला IRCTC च्या संकेतस्थळावर मिळेल. 



कधीही न पाहिलेल्या ठिकाणांना भेट देण्याची संधी 


आतापर्यंत अनेकांनीच राजस्थान आणि तेथील ठिकाणं चित्रपट किंवा फारफारतर मालिकांच्या माध्यमातून पाहिली. पण, या सहलीच्या माध्यमातून तुम्ही हवा महल, सिटी पॅलेस, जंतर मंतर, आमेर किल्ला, बिर्ला मंदिर, जलमहल, करणी माता मंदिर, जुनागढ किल्ला, जयगढ किल्ला, मेहरानगढ या आणि अशा ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊ शकता.