नवी दिल्ली :  IRCTC Tatkal Ticket App: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता तुम्हाला तिकिट मिळण्यासाठी अडचणी येणार नाहीत. रेल्वेने तत्काल तिकिटांसाठी नवीन ऍप लॉंच केले आहे. हे ऍप आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या ऍपच्या माध्यमातून घरबसल्या काही सेकंदात तुम्ही तिकिट बुक करू शकता.


आता कन्फर्म तिकिट मिळण्यासाठी अडचणी येणार नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्यावेळी रेल्वेने अचानक प्रवास करायची वेळ येते. रेल्वेने अचानक प्रवास करण्यासाठी तत्काळ तिकिट मिळवण्यासाठी नवीन ऍप लॉंच करण्यात आले आहे. 



ऍपच्या माध्यमातून मिळतील जबरदस्त फायदे


- रेल्वेतर्फे लॉंच करण्यात आलेल्या या ऍपवर तुम्हाला तत्काळ कोट्यातून तिकिट मिळू शकते.


- वेगवेगळ्या ट्रेनचे क्रमांक टाकून  रिकाम्या उपलब्ध जागांची माहिती घेता येईल.


- या ऍपवर घरबसल्या संबधित रूटवर चालणाऱ्या सर्व ट्रेनच्या तत्काळ तिकिटांची माहिती मिळू शकते. 


- या ऍपला गुगल स्टोअरवरूनही डाऊनलोड करता येते.


-  या ऍपमध्ये तिकिट बुकिंगसाठी एक मास्टर लिस्टदेखील आहे. त्यामुळे तिकिट काढण्यासाठी तुमचा वेळ वाया जाणार नाही.


तिकिट बुकिंग करण्यासाठीची वेळ


या ऍपवर प्रवाशी सकाळी 10 वाजेपासून तत्काळ तिकिट सेव डेटाच्या माध्यमातून बुकिंग करू शकता.


या तिकिटांसाठी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे.


त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन तिकिट मिळू शकेल.