International Flights Resume : दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे (Corona New Variant) जगभरात चिंता व्यक्त होत असतानाच आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरु होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले होते.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून भारत प्रतिबंधित 14 देश वगळता नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करणार आहे. असं असलं तरी या 14 देशांसोबत सध्याची एअर-बबल फ्लाइट व्यवस्था सुरू राहील.


'एअर बबल करारा'नुसार संबंधित दोन्ही देशांमध्ये विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणं करता येऊ शकतात. 'एअर बबल'द्वारे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.