Aon PLC on Salary Hike: नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला आपला पगार कधी वाढणार? याची काळजी सतावत असते. त्यामुळे सर्वजण पगारवाढीच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. पगारवाढ झाली की  वर्षभर पुन्हा काम करण्यासाठी जोर मिळतो. आता 2024 संपायला 2 महिने बाकी आहेत. याआधी नोकरदार वर्गाचा पुढच्या वर्षी किती पगार वाढेल? यासंदर्भात एऑन पीएलसीच्या सर्व्हे केला होता. काय आहे हा सर्व्हे? जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्व्हेनुसार देशात 2025 म्हणजेच पुढच्यावर्षी आधीपेक्षा जास्त पगारवाढ मिळेल. रिपोर्टनुसार 2025 मध्ये लोकांचा सरासरी पगा 9 टक्क्यांनी वाढू शकतो. 2024 मध्ये ही वाढ 9.3 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 


वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सकारात्मक व्यवहाराचे वातावरण असल्याने हा अंदाज लावण्यात येत आहे. आपण कोणत्या सेक्टरमध्ये किती टक्के पगारवाढ होऊ शकते? याचा वर्तवण्यात आलेला अंदाज जाणून घेऊया. 


टेक्निकल प्रोडक्शनच्या कर्मचाऱ्यांचा पगार 9.3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तर सर्व्हिस सेक्टरमध्ये 8.1 टक्के पगारवाढ होऊ शकते. एऑनने दिलेल्या माहितीनुसार, जग आर्थिक आव्हानांचा सामना करत असतानादेखील अनेक सेक्टर्समध्ये सकारात्मक वातावरण बनले आहे. यामुळे मॅन्यूफॅक्चरिंग, बायोसायन्स आणि रिटेल सेक्टर्समध्ये पगारवाढ होण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. 


या कर्मचाऱ्यांना मिळणार तगडा पगार 


भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. विविध क्षेत्रात भारत प्रगतीपथावर आहे. त्यामुळे व्यवसायात वृद्धी होतेय. कंपन्यांना चांगले कर्मचारी हवे आहेत. त्यांना कंपन्या जास्त पगार द्यायला तयार आहेत. महागाईमध्ये वाढ होत असल्याने कर्मचाऱ्यांना वाढीव पगाराची गरज आहे. 


नोकऱ्यांच्या मार्केटमध्ये कंपन्यांनी बदलत्या बाजाराच्या आकड्यांवर लक्ष देऊन रणनीती बनवायला हवी. या वर्षी सरासरी 16.9 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली. तसेच 2023 मध्ये हे प्रमाण 18.7 टक्के इतके आणि 2022 मध्ये 21.4 टक्के इतके होते. 


एऑनच्या सर्व्हेनुसार, कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरी सोडली असेल तर कंपनी अंतर्गत विकास आणि उत्पादकतेवर लक्ष केंद्रीत करत आहे. एऑनचा हा सर्व्हे 40 व्यवसायांच्या 1 हजार 176 हून अधिक कंपन्यांच्या आकड्यांवर आधारित आहे.