मुंबई : कोरोनाच्या काळात देशात राष्ट्रीय महामार्गांचा सुकाळ पाहायला मिळाला. 2020-21 या वर्षात दररोज 36.5 किमी रस्त्यांचं बांधकाम झालं. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींनी ही माहिती दिली. 24 तासात चार मार्गिकांचा अडीच किलोमीटर रस्ता बनवून भारतानं विश्वविक्रम रचला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडकरी म्हणाले की, भारताने अवघ्या 24 तासात अडीच किमी फोर लेन काँक्रीट रोड पूर्ण करून विश्वविक्रम केला आहे. याशिवाय केवळ 21 तासांत 26 किलोमीटर एक लेन बिटूमेन रोडचे काम पूर्ण झाले आहे.



'बांधकामाचा हा वेग कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यात कंत्राटदारांना पाठिंबा, कराराच्या तरतुदी शिथिल करणे, उप-कंत्राटदारांना थेट देयके आणि साइटवरील कामगारांसाठी खाण्यापिण्याशिवाय वैद्यकीय सुविधा यांचा समावेश आहे.'



या प्रकल्पांमध्ये गुणवत्ता नियंत्रणासाठी इंडियन रोड काँग्रेस (आयआरसी) च्या निकषानुसार बांधकाम सुरू असल्याचे गडकरी म्हणाले.