India to Bangkok: बॅंकॉकला फिरायला जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. काहीजण हानीमूनसाठी बॅंकॉकचा पर्याय निवडतात. आतापर्यंत हवाई मार्गाने हा प्रवास व्हायचा. पण यासाठी खूप पैसे त्यांना मोजावे लागतात. पीक सीझनमध्ये तर ही किंमत आणखी वाढते. इतकंच नव्हे तर कधी-कधी फ्लाइट रद्द होते किंवा सीट मिळत नाही. पण लवकरच तुमचा हा तणावही दूर होणार आहे. कारण भारत ते बँकॉक हा महामार्ग बनवण्याची योजना सुरु आहे. यानुसार कोलकाता आणि बँकॉत हे रस्त्याने जोडले जाणार आहे. हा त्रिपक्षीय महामार्ग सुमारे 4 वर्षात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा मेगा त्रिपक्षीय महामार्ग बँकॉकपासून सुरू होईल आणि म्यानमारमधील कालेवा, मंडाले, तामू, यांगूनमधून जाईल. यामध्ये  थायलंडमधील सुखोथाय, माए सॉट या शहरांचा समावेश असेल. जोपर्यंत भारतीय शहरांमध्ये कोहिमा, मोरे, श्रीरामपूर, गुवाहाटी, कोलकाता आणि सिलीगुडीमधूनही जाईल.  


हा महामार्ग एकूण 2,800 ते 2,820 किमी अंतराचा असेल. हा महामार्ग भारतातील सर्वात लांब पल्ल्याचे कव्हर करेल, अशी माहिती देण्यात आली. या प्रकल्पाचे बहुतांश काम थायलंडमध्ये पूर्ण झाले आहे. मात्र, इतर मार्ग जोडण्यासाठी आणखी 2 ते 3 वर्षे लागतील, अशी माहिती परराष्ट्र खात्याचे उपमंत्री विजयवत इस्राभाकडी यांनी दिली.


या त्रिपक्षीय महामार्गाच्या उभारणीमुळे लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यवसाय करता येणार आहे. या प्रकल्पाचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. फ्री प्रेस जर्नलमधील वृत्तानुसार, महामार्गाच्या काही भागांचे काम अजूनही सुरू आहे.


कोलकाता ते बँकॉकसाठी महत्त्वाच्या गोष्टी


कोलकाता आणि बँकॉक दरम्यान बांधण्यात येणारा हा रस्ता अनेक राज्ये आणि देशांमधून जाणार 
कोलकाता आणि बँकॉकला जोडणारा महामार्ग प्रकल्प बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यांतर्गत 
यामुळे वाहतूक आणि सोयीस्कर प्रवासाचा उत्तम अनुभव वाढण्यास मदत