अग्निवीर भरती: देशात अग्निपथ योजनेला काही राज्यात विरोध होत असताना भारतीय लष्कराने आता भरती संदर्भात अधिसूचना जारी केलीये. भरतीसाठी जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार, जुलैमध्ये यासाठी नोंदणी सुरू होणार आहे. (Notification For Agniveer Recruitment)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय लष्कराच्या अधिसूचनेनुसार 8वी आणि 10वी उत्तीर्ण युवकही यासाठी अर्ज करू शकणार आहेत. अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षांसाठी भरती केली जाणारे. पण नंतर त्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन किंवा ग्रॅच्युटी मिळणार नाहीये.


अग्निवीर भरतीमध्ये सामील होण्यासाठी, सर्व उमेदवारांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.


पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय लष्कराच्या JOININDIANARMY.NIC.IN या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील.