indian army jawan stand in snow : सध्या प्रत्येकजण गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. घरा राहून चमचमीत पदार्थांचा आनंद घेत ही थंडी अनुभवत आहेत. कुणी स्वेटर, ब्लॅंकेट घेऊन स्वत:चा थंडी पासून बचाव करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच वेळी आपले जवान बर्फाच्या वादळताही भारत मातेची सेवा करण्यासाठी ठामपणे कसे उभे असतात. याता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पासून एक वेगळी उब जाणवत आहे. ज्यात एक भारतीय सेनेतील जवान बर्फवृष्टी आणि जोराच्या वाऱ्यातही जागेवरून हलत देखील नाही. त्याचा हा अंदाज खरंच भारावून टाकणारा ठरतो आहे. गुडघ्यापर्यंतच्या बर्फात उभा राहून तो कर्तव्य पार पाडत आहे.


भारतीय सैनिकांनी नेहमीच आपल्या पराक्रमाने आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे. त्याच्या ध्येर्याचे आणि बहादुरीचे किस्से अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात. पण या व्हिडीओ आज प्रत्येकाला आपल्या जवानांचा गर्व वाटेल आणि त्यांच्या विषयी तुमच्या मनात अधिक जास्त सन्मान निर्माण करेल असा आहे.



हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ ट्विट करत संरक्षण मंत्रालयाचे उधमपुर जनसंपर्क अधिकाऱ्याने लिहिलं की, 'आपण आपल्या लक्ष्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकत नाही. पण प्रबळ इच्छाशक्ती आणि बलिदानाने आपण आपलं लक्ष्य मिळवू शकतो. जगण्यासाठी सगळ्यांकडे एक जीवन आहे. पण देशाचा मुद्दा असेल तर कोण उभा राहतो?'.