नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये हिवाळ्यात सर्वाधिक प्रमाणात बर्फवृष्टी होते. अशाच बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणचे संपर्क तुटले आहेत. यामुळे तिथे राहणाऱ्या सामान्यांच जीवन विस्कळीत झाले आहेत. एका बाजूला बर्फवृष्टीचा तडाखा तर दुसरीकडे आलेल्या वैद्यकीय आप्तकालीन गोष्टीकरता भारतीय जवान धावून आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय जवानांच्या XV कॉर्प म्हणजे चिनार कॉर्प्सवर सध्या सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. बर्फवृष्टीमुळे सगळे रस्ते बंद पडले होते अशा वेळी प्रसुतीकळा सुरू झालेल्या गरोदर महिलेसाठी भारतीय जवान धावून आले. 



गुडघ्यापर्यंत बर्फ असलेल्या ठिकाणाहून महिलेला तात्काळ रूग्णालयात दाखल करायचे होते. यावेळी 100 जवानांनी महिलेला 4 तासांचा प्रवास करून रूग्णालयात दाखल केले. सोमवारी या महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. यावेळी 100 जवान आणि 30 स्थानिक नागरिकांनी गुडघ्यापर्यंत बर्फाचे थर पार करत चास तास चालत शहरातील रूग्णालयात महिलेला सुखरूर दाखल केलं. 



याबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विट करून जवानांचे अभिनंदन केलं आहे. भारतीय लष्कर देशसेवेसाठी कायम सतर्क असते. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.