जम्मू काश्मीरच्या अनंतनागमधील कोकरनाग येथे भारतीय लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने भारतीय लष्कराने दहशतवादी लपलेल्या ठिकाणी बॉम्ब टाकले. दरम्यान ठार झालेला दहशतवादी ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भारतीय लष्कर दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या हेतून कारवाई करत असून, शनिवारी चौथ्या दिवशीही हे ऑपरेशन सुरु आहे. दहशतवादी जंगलात लपले असून, ड्रोनच्या सहाय्याने बॉम्बचा वर्षाव केला. 


बारामुल्ला येथे 3 दहशतवादी ठार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, बारामुल्ला येथे जवानांनी तीन दहशतवादी ठार केले आहेत. उरी येथे ही चकमक झाली आहे. दोन दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराच्या हाती लागले आहेत. पण तिसरा दहशतवादी जिथे मारला गेला आहे, तो परिसर पाकिस्तानी पोस्टपासून जवळ आहे. यामुळे पाकिस्तानकडून कव्हर फायरिंग केलं जात आहे. तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.



यादरम्यान, किश्तवाड येथे पोलिसांनी त्या घरांवर नोटीवर लावली आहे ज्या घरातील लोक दहशतवादी प्रशिक्षणासाठी PoK मद्ये गेले आहेत. 


ड्रोनच्या सहाय्याने केला जात आहे गोळीबार


कोकरनाग येथे लपलेल्या दहशतवाद्यांवर गोळीबार करण्यासह जवान ड्रोनच्या सहाय्याने त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. सुरक्षा जवानांनी फोर्स्टर परिसरात दहशतवादी लपले असलेल्या संशयित ठिकाणी बॉम्ब फेकले. चिनार कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल राजीव घई स्वत: या ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत. 


चकमकीच्या ठिकाणी सकाळपासून फायरिंग


भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मी पोलिसांकडून हे ऑपरेशन केलं जात आहे. चकमकीच्या ठिकाणी सकाळपासून शांतता होती. पण काही वेळाने तिथे गोळीबार सुरु झाला होता. डोंगराच्या आसपासच्या परिसरात गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. येथे बऱ्याच वेळापासून पाऊस सुरु आहे, यामुळे ऑपरेशनमध्ये अडथळे येत आहेत. पण अद्यापही कोकरनाग येथे चकमक सुरु आहे. 


बारामुल्ला येथे पाकिस्तानी पोस्टजवळ फायरिंग


बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ लष्करासह झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितलं आहे की, बारामुल्ला जिल्ह्यातील उरी परिसरात लष्कर आणि पोलिसांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. येथएही सर्च ऑपरेशन सुरु आहे. अनंतनाग जिल्ह्यात चकमक सुरु असतानाच बारामुल्ला येथेही ही चकमक झाली.