Indian Army New Notification: भारतीय सैन्यदलात काम करण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. सीमेवर देशासाठी लढावी अशी इच्छा असते. यासाठी तरुण फिटनेससोबत परीक्षेची तयारी करत असतात. देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता भारतीय सैन्यदल लवकरच आपल्या वेबसाईट joinindianarmy.nic.in वर जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. भारतीय सैन्य TES अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 14 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 14 डिसेंबर 2022 पर्यंत चालेल. बारावी आणि  टीईएस 49 कोर्सेससाठी नोटिफिकेशन जारी करणार आहे.  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह बारावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी पात्र असतील. टीईएस-49 अभ्यासक्रमांसाठी JEE Mains 2022 अनिवार्य आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा 16 वर्षे 6 महिने आणि कमाल वयोमर्यादा 19 वर्षे 6 महिने आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्ज केल्यानंतर उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलवलं जाईल. पात्र उमेदवाराची निवड दोन टप्प्यांच्या आधारे केली जाणार आहे. जे उमेदवार पहिल्या टप्प्यात पात्र होतील, त्यानाच दुसऱ्या फेरीसाठी बोलवलं आहेत. एसएसबी मुलाखतीत निवड झाल्यानंतर काम करण्याची सुवर्णसंधी मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना महिना 56,100 रुपये ते 177500 रुपयांपर्यंत पगार मिळेल.


दोस्तासाठी काय पण! जीवाची पर्वा न करता सापापासून वाचवलं मित्राला, पाहा थरारक Video


अर्जदार उमेदवार अविवाहित पुरुष असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर फोटो, सही, शैक्षणिक सर्टीफिकेट (10 वी आणि 12 वी पास), डोमिसाईल सर्टिफिकेट, पॅन कार्ड, आधारकार्ड या कागदपत्रांची आवश्यकता आहे. उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2004 पूर्वी आणि 1 जानेवारी 2007 नंतर झालेला नसावा.