भारतीय लष्कराची कारवाई, पाकिस्तानचे दोन बॅट कमांडो ठार
पाकिस्तानकडून सातत्याने नियंत्रण रेषेवर या ना त्या कारणाने उल्लंघन करण्यात येत आहे. आज उरी सेक्टरमध्ये गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून मोठा कट रचन्यात आला होता. मात्र, हा कट भारतीय जवानांनी उधळून लावताना पाकचे दोन बॅट कमांडो ठार केलेत.
श्रीनगर : पाकिस्तानकडून सातत्याने नियंत्रण रेषेवर या ना त्या कारणाने उल्लंघन करण्यात येत आहे. आज उरी सेक्टरमध्ये गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून मोठा कट रचन्यात आला होता. मात्र, हा कट भारतीय जवानांनी उधळून लावताना पाकचे दोन बॅट कमांडो ठार केलेत.
मे महिन्याच्या सुरुवातीला नियंत्रण रेषेवर गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर बॅट कमांडोंनी हल्ला चढवला होता. त्यावेळी त्यांनी दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केला होता. यापूर्वी याच कमांडोंनी नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांना मारल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती.
तसेच भारतीय लष्कराने मंगळवारी नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडीओ सार्वजनिक केल्यापासून पाकिस्तानचा तिळपापड होत आहे. पाकिस्तानातील जनतेसमोर तिथल्या लष्कराची नाचक्की झाल्याने पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरीचा प्रयत्न सुरुच आहे.
पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ आपल्या बॉर्डर अॅक्शन टीमचे (BAT) कमांडो तैनात केले होते. पाकिस्तान बॉर्डर अॅक्शन टीममध्ये केवळ सैन्य नाही तर दहशतवाद्यांचाही समावेश आहे, असे वृत्त एका इंग्रजी वाहिनीने दिलेय. तसेच कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगित मिळाल्यामुळे पाकिस्तान चांगलीच नाचक्की झालेय. त्यानंतर नियंत्रण रेषेजवळ खुरापती सुरुच आहेत.