Cough syrup made by Indian company fails WHO test : पावसाळा असल्याने प्रत्येक घरात कोल्ड सिरप असतं. अशात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) धक्कादायक अहवाल समोर आला आहे. भारतातील एका कफ सिरपवर आरोग्याशी खेळण्याचा आरोप केला आहे. हे कफ सिरप दूषित आणि प्राणघातक असून ते महाराष्ट्रातील एका कंपनीचं आहे. या कंपनीचं नाव आहे फोरर्ट्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड (Fourrts (India) Laboratories Pvt Ltd). ही कंपनी कोल्ड सिरप इराकमध्ये विक्रीसाठी पाठवत होती. (Indian Cough syrup made by maharashtra company Cold Out fails WHO test Iraq news )


'या सिरपमध्ये विषारी रसायन'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WHO ने एका निवेदन प्रसिद्ध केलं की, India's Fourrts (India) Laboratories Pvt Ltd ही Cold Out Cough Syrup चं मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारी कंपनी आहे. ही कंपनी इराकच्या Dabilife Pharma Pvt Ltd ला कफ सिरपची विक्री करते.'कोल्ड आऊट' नावाचं हे सर्दीचं औषध असून इराकमध्ये पुरवल्या जाणाऱ्या या औषधात विषारी रसायने असल्याचं समोर आलं आहे. 


'माणसांसाठी अत्यंत धोकादायक'


WHO ने निवेदनात स्पष्ट केलं की, 'चाचणीसाठी पाठवलेल्या नमुन्यात (Cold Out Cough Syrup) डायथिलीन ग्लायकोल (0.25%) आणि इथिलीन ग्लायकोल (2.1%) ची अस्वीकार्य मात्रा असल्याचं सिद्ध झालं. अहवालानुसार इथिलीन ग्लायकॉल आणि डायथिलीन ग्लायकॉल या दोन्हींसाठी स्वीकार्य सुरक्षा मर्यादा ही 0.10% पेक्षा जास्त कधीच नसावी. डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचे सेवन हे माणसांसाठी अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक असतं. त्यामुळे या सिरपमुळे गंभीर आरोग्य समस्या होतात. 


'कंपन्यांनी कोणतीही हमी दिली नाही'


धक्कादायक म्हणजे लॅब टेस्टमध्ये सॅम्पल फेल झाल्यानंतरही (Cold Out Cough Syrup) या गोल्ड सिरप बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या कंपनीने त्याचा सुरक्षित करण्याच्या पद्धतींची कोणतीही हमी दिली नाही. 


दरम्यान गेल्या वर्षी भारतात बनवलेले कफ सिरपमुळे गाम्बिया आणि उझबेकिस्तानमध्ये अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना हा निष्काळीपणा कंपनीकडून होत असल्याचा संस्थेकडून प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे. या घटनेनंतर भारत सरकारने कडक कारवाई करत अनेक कंपन्यांना मोठा दंड ठोठावण्याबरोबरच त्यांचे औषध परवानेही रद्द केले तरी कंपन्यांमध्ये धाक दिसत नाही. 


(एजन्सी IANS)