मुंबई : तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातील 1,2,5 आणि 10 रुपयांचे नाणे पाहिले असणार. परंतु तुम्हा कधी त्यावर असलेल्या खुणांना निट पाहिले आहे का? तुम्ही कधी विचार केला आहे की, या नाण्यांवरती वेगवेगळे चिन्ह का असतात? त्याचा अर्थ काय ? आज तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात एकूण चार अशी ठिकाणे आहेत. जेथे नाणी तयार केली जातात. मुंबई मिंट, कलकत्ता मिंट, हैदराबाद मिंट आणि नोएडा मिंट या चार ठिकाणांवरुन नाणी बनून येतात. ज्याचा वापर आपण रोजच्या जीवनात करतो. यामधील सगळ्यात जुने मिंट म्हणजेच नाणी बनवण्याचे ठिकाण आहे, मुंबई आणि दिल्ली. जे 1859 म्हणजे ब्रिटिश काळापासून भारतासाठी मुद्रा बनवतात.


आता तुम्ही म्हणाल हे मिंट म्हणजे काय? तर मिंट म्हणजे, ते ठिकाण आहे ज्याला भारत सरकारकडून आधिकृत रित्या नाणे किंवा मृद्रा बनवण्यासाठी संमंती दिली आहे. मिंटला टकसाल देखील म्हंटले जाते.


हैदराबाद मिंटला सन 1903 मध्ये हैदराबादी निजाम सरकार ने स्थापित केले होते. त्यानंतर 1950 मध्ये भारत सगकारने त्याला आपल्या ताब्यात घेतले.


नोएडा (दिल्ली) मिंटला सन 1986 में स्थापित केले होते, त्यानंतर 1988 नंतर भारतातील सगळ्याच मिंटमध्ये स्टेनलेस स्टीलच्या नाण्यांच्या वापर होऊ लागला.



काही नाण्यांवरती तारखेच्या किंवा सालाच्या खाली स्टार मार्क केलेले तुम्ही पाहिले असणार, तर हे चिन्ह हैदराबाद मिंटच्या नाण्यांवरती असते. नाण्यामध्ये लिहिलेल्या तारखेच्या खाली डायमंड आणि त्याच्या खाली एक डॉट असेल, तरी ते नाणे हैदराबाद मिंटचे आहे असे समजावे.



मुंबई मिंटच्या नाण्यांवरती तारखेच्या खाली डायमंड आकार असतो. असा आकार तुम्हाला दिसला तर तो मुंबई मिंटचा आहे असे समजावे.