दुबईमध्ये एका रात्रीत भारतीय बनला करोडपती
त्याचे नशीब इतके बलवत्तर की त्याला ती लॉटरी लागली आणि तो एका रात्रीत करोडपती बनला
नवी दिल्ली : दुबईत राहणारा एक भारतीय रातोरात करोडपती बनला आहे. मुळचा केरळचा असलेला दानिश कोठारंबन हा २५ वर्षीय युवक दुबईत राहतो. काही दिवसांपूर्वी त्याला नशिब आजमावून पाहावे वाटले. त्याने लॉटरीचे तिकीट खरेदी केले. त्याचे नशीब इतके बलवत्तर की त्याला ती लॉटरी लागली आणि तो एका रात्रीत करोडपती बनला. आयुष्यात प्रथमच लॉटरीचे तिकीट खरेदी करणाऱ्या दानिशला ७ कोटी रूपयांची (१ मिलीयन डॉलर) लॉटरी लागली आहे..
दानिश काही दिवसांपुर्वी सुट्टी घालवण्यासाठी केरळला आला होता. दरम्यानच्या काळात त्याने एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले. पण, हे तिकीट खरेदी करताना त्याला जराही अंदाज नव्हता की, त्याला नशीब अशा पद्धतीने साथ देईन. पण, त्याचे नशीब फळले. लॉटरी लागल्याची माहिती मिळाली तेव्हा तो भारतात आपल्या घरी होता.
स्वप्नातही पाहिला नव्हता इतका पैसा
दानिशने दुबईतील प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी स्वप्नातही इतका पैसा पाहिला नव्हता. तसेच, लॉटरीचे तिकीट खरेदी केल्यामुळे इतका पैसा मिळेल असेही मला कधी वाटले नव्हते. मी तसा कधी विचारच केला नव्हता.
दरम्यान, दानिश प्रमाणेच जॉर्डन येथे राहणाऱ्या यॉन ने यालाही दानिश इतक्याच रकमेची लॉटरी लागली आहे. दानिशला लागलेल्या लॉटरीची रक्कम दुबई ट्यूडी फ्री मिलेनियम मलिनेयर आणि फाईनेस्ट आचरिज नावाची कंपनी देणार आहे.
मार्चच्या सुरूवातीला ७ भारतीयांना लागली होती लॉटरी
दरम्यान, मार्चच्या सुरूवातीला आबुदाबी येथे राहणाऱ्या ७ भारतीयांना लॉटरी लागली होती. यात थैनसिलास नावाच्या व्यक्तीला १२ कोटी, मिळाले होते. त्याने सांगितले की, मला ८व्यांदा लॉटरी लागली आहे.तर इतर ६ भारतीयांना १७-१७ लाख रूपये मिळाले होते. थैनसिलासनंतर लॉटरी विजेत्यांची नावे अशी: जॉर्ज रश्मीन, रवी चव्हाण, जीजू जय प्रकाश, पॅट्रीक मायकेल, राजा मोहम्मद मजीद मजीद, पल्लिकरा वासुदेवन आणि बहरीनचा अदनान अब्दुल रहमान मोहम्मद युसुई.