नवी दिल्ली : मिग विमानांनी पाकिस्तानचे एक विमान पाडल्याचा दावा भारताच्या परराष्ट्र मत्रांलयाने केला आहे. भारताने एक विमान गमावल्याची माहितीही यामध्ये देण्यात आली आहे. दरम्यान भारताचा एक वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचे पाकिस्तानतर्फे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानला प्रत्युत्तरासाठी भारताचे 6 विमानांचे उड्डाण, 5 विमाने परतल्याचे सांगण्यात येत आहे. विंग कमांडर अभिनंदन आपल्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तानतर्फे करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये उदभवलेली परिस्थिती सध्या अतिशय तणावाच्या वळणावर आलेली असून, पाकिस्तानकडून वारंवार भारतीय वायुदलाचा हल्ला परतवून लावण्याची क्षमता आपल्या सैन्यात असल्याचा दावा करण्यात येत आहे. एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पाकिस्तनच्या वायुदलाने नियंत्रण रेषेपलीकडे काही हल्ले केले असून, भारताच्या हल्ल्याचं उत्तर देत आत्मसंरक्षणाचा हक्क असल्याचंच या माध्यमातून आम्हाला दर्शवायचं होतं, असं MoFA प्रवक्ते मोहम्मद फैजल म्हणाले.


याआधी भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईत जैश ए मोहम्मदचे 300 दहशतवादी मारले गेले. एवढंच नव्हे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा जावई युसूफ अजहरला ठार करण्यात आले. भारतीय वायुसेनेने 12 मिराज फायटरच्या मदतीने साधारण 1000 किलो बॉम्बचा वर्षाव करण्यात आला होता. 14 फेब्रुवारीला भारतीय लष्करावर झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भारताचे 40 जवान शहिद झाले आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.