Gautam Adani Downfall: हिंडर्नबर्गचा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीय उद्योगपती गौतम अदानींच्या (Industralist Gautam Adani) अडचणी वाढत जात आहेत. या अहवालानंतर फक्त अदानींच्याच नाही तर एकूणच उद्योगक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यातून आता अदानींच्या संपत्तीतही मोठ्या प्रमाणात घसरण होते आहे. त्यामुळे गौतम अदानी हे नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या (Gautam Adani out from World's Top Richest People) यादीतून घसरलं आहे. तेही इतकं की आता अदानी टॉप 30 तूनही बाहेर गेले आहेत. त्यामुळे गौतम अदानींचीही संपत्ती खाटकन घसरली आहे. जगातील सर्वात श्रीमंत मानले जाणारे उद्योगपती गौतम अदानी यांच्याकडे आता केवळ एवढीच संपत्ती उरली आहे. 24 जानेवारीला हिंडनबर्गचा (Hindenberg) हा रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता ज्यानंतर अदानी हे 10 व्या क्रमांकावरून मग 20 व्या क्रमांकावरून खाली आले होते आता ते 30 व्या क्रमांकावरूनही खाली फेकले गेले आहेत. (Indian Industralist Gautam Adani continues to fall down from worlds top richest people)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या महिन्याभरापासून गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट होते आहे. त्यामुळे आता गौतम अदानींच्या श्रीमंतीला (Gautam Adani Shares) उतरती कळा लागली आहे. गेल्याचवर्षी गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून दुसऱ्या क्रमांकावर होते आता ते पहिल्या तीसमध्येही नाहीत. यावर्षी अदानी एन्टरप्राईज आणि अदानी पोर्ट्स (Adani Ports) यांचे शेअर्स हे गेल्या आठवड्यातून सर्वाधिक घसरल्याचे दिसत आहेत. त्याचा फटाका हा अदानी यांच्यासह त्यांच्या गुंतवणूकदारांनाही बसला आहे. त्यामुळे अदानींच्या उद्योगसमूहासमोर यामुळेच भलीमोठी आव्हानं आहेत. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न अदानींकडून होत असले तरी त्याचा परिणाम फारसा होतानाही दिसत नाहीये. 


काय काय घसरले? 


1. अदानींचा मार्केट कॅप (Market Cap) हा 12 लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक प्रमाणात घटला आहे. 
2. अदानींच्या शेअर्सचे मूल्य (Share Value) घसरले आहे. 
3. समोर आलेल्या माहितीनुसार, सुरूवातीला जेव्हा अदानी चौथ्या क्रमांकावर होते तेव्हा त्यांची संपत्ती ही 116 अब्ज डॉलर इतकी होती. त्यानंतर जेव्हा हिंडनबर्गचा रिपोर्ट आला तेव्हा त्यांची संपत्ती ही खाटकन घसरली आणि ती इतकी घसरली की अजूनही त्यांच्या संपत्तीची घसरण ही चालूच आहे. 


हेही वाचा - राखीचा जलवा सुरूच! कॉन्ट्रोव्हर्शिअल क्विन Rakhi Sawant पुन्हा अडकणार लग्नबंधनात? नवा VIDEO व्हायरल


अदानींचा फटाका किती काळ राहणार? 


2023 हे वर्षे अदानींसाठी अत्यंत कठीण होते. इतक्या वर्षांत कमावलेली संपत्ती आणि प्रेसटेजिस अदानी यांच्यावर प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टनं धूळीला मिसळलं आहे. त्यामुळे अदानींच्या मानेवर टांगती तलवार होती. त्यामुळे गौतम अदानींच्या अडचणीत वाढ झाली. त्यांची संपत्ती तर घटलीच पण त्याच अदानी जगातील श्रीमंत व्यक्तींच्याही यादीतून हद्दपार झाले.