बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं विद्यार्थी आंदोलन सोमवारी प्रचंड चिघळलं. यानंतर शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत थेट देश सोडून भारत गाठला. यासह शेख हसीना यांची बांगलादेशमधील 15 वर्षांची राजवट संपुष्टात आली आणि लष्कराने सत्ता आपल्या हातात घेतली. दरम्यान बांगलादेशमधील आंदोलन उग्र होण्यामागे तसंच शेख हसीन यांना देश सोडण्यास भाग पाडण्यामागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि चीन यांचा सहभाग होता अशी शंका भारतीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तान आणि चीनच्या सहभागाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जमात-ए-इस्लामी बांगलादेशची विद्यार्थी शाखा इस्लामी छात्र शिबीरने (ICS) देशात अशांतता निर्माण करण्यात आणि पाकिस्तान तसंच चीनला फायदा होईल असं शासन सत्तेत आणण्यासाठी  महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


राफेल्स; रडार्स अन् डोवाल...; हसीना यांना बांगलादेशमधून सुखरुप बाहेर काढण्यासाठी भारताने काय केलं पाहिलं का?


 


एका गुप्तचर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चिनी संस्थांकडून आर्थिक मदत घेत आयएसआयने शेख हसीना यांच्या सरकारला अस्थिर करण्यासाठी सक्रियपणे काम केलं. इस्लामी छात्र शिबीर मागील अनेक महिन्यांपासून बांगलादेशात हिंसाचाराचं नियोजन आणि भडकावण्यात गुंतलं होतं. त्यांनी आयएसआ आणि चीनकडून फंडिंग आणि समर्थन मिळाले आहे.


भारत आणि चीन या दोन्ही देशांसोबत संतुलित संबंध राखण्याच्या हसीना यांच्या प्रयत्नांमुळे बीजिंग नाराज झालं असावं अशी शक्यता आहे. यामुळेच त्यांनी शेख हसीना यांना सत्तेतून पायऊतार करण्यासाठी इस्लामी छात्र शिबीरच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला असावा असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखल्या जाणा-या ICS ने आयएसआयचं समर्थन असणाऱ्या दहशतवादी गट हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामीशी (HuJI) हातमिळवणी केली आहे. पुराव्यांनुसार, ICS सदस्यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्याचं दिसत आहे.


चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालयाचादेखील यात सहभाग असावा अशी शंका उपस्थित होत आहे. कारण बीजिंगचे ढाकामध्ये एक अशी व्यवस्था स्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे जे त्यांच्या धोरणात्मक हितसंबंधांशी अधिक जवळून जुळेल आणि ज्यावर भारताचा प्रभाव कमी असेल.