नवी दिल्ली : जागतिक शांतता आणि स्थैर्याचा धक्का पोहोचवणाऱ्या दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी साऱ्या जगाने एकत्र येण्याची गरज असल्याचं सूचक वक्तव्य भारतीय नौद प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनी केलं. नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सागरी मार्गावर होणाऱ्या काही हालचालींचा आधार घेत येत्या काळात सागरी मार्गानेही दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली. दहशतवाद्यांना सागरी मार्गाने हल्ला करण्यासाठीचं प्रशिक्षण देण्यात येत असल्याची बाब त्यांनी यावेळी अधोरेखित केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ फेब्रुवारीला जम्मू- काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या कट्टरतावादी आणि फिदाईनने घडवून आणलेल्या हल्ल्याविषयीची त्यांनी वक्तव्य केलं. हा  हल्ला भारतात अस्थैर्य निर्माम करण्याच्या उद्देशाने घडवून आणल्याचं म्हणत त्यासाठी एका राष्ट्राकडून हल्ल्याना मदत मिळाली होती, असं ते म्हणाले. नाव न घेता त्यांनी दहशतवादी कारवायांना समर्थन देणाऱ्या पाकिस्तानवर निशाणा साधला. सागरी सीमेविषयीच्या काही अहवालांच्या आणि माहितीच्या आधारे त्यांनी दहशतवद्यांना या मार्गानेही हल्ला करण्याचं प्रशिक्षण देण्यात येतं ही बाब स्पष्ट केली. 




इंडो- पॅसिफीक सागरी पट्ट्यात गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याच दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे. या भागात येणाऱ्या काही राष्ट्राना या साऱ्याचा फटकाही बसला आहे. इतकच नव्हे तर, गेल्या काही वर्षांमध्ये दहशतवादाचं जाळं मोठ्या प्रमाणावर पसरलं असून, ते आणखी विस्तारत आहे, हा मुद्दा लांबा यांनी त्यांच्या भाषणातून मांडला. 



भारतीय नौदल कोणताही हल्ला परतवून लावण्यासाठी सुसज्ज असल्याचं स्पष्ट करत त्यांनी दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी भारतीय सुरक्षा दल सक्षम आहे ही बाब प्रकर्षाने पुढे ठेवली. वायुदल प्रमुख बी.एस. धानोआ यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय नौदल प्रमुखांनीही दहशतवाद आणि या वैश्विक समस्येला तोंड देणाऱ्या भारताविशयी आपली प्रतिक्रिया दिली.