Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येतेय. इंडियन नेव्हीमध्ये नोकरीची संधी आहे. इंडियन नेव्हीने शॉर्ट सर्व्हिस कमीशन पदासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. 254 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. इच्छु उमेदवार नेव्हीच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करु शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

https://www.joinindiannavy.gov.in  या वेबसाइटवर जाऊन उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 24 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 10 मार्च 2024 पर्यंत अर्ज पाठवू शकता. त्यानंतर अर्ज पाठवता येणार नाही. तसंच, जे उमेदवार अविवाहित आहेत तेच या पदांसाठी पात्र आहेत, असं अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. 


Indian Navy Recruitment 2024: महत्ताचे निवेदन 


संस्था- इंडियन नेव्ही


रिक्त पदाचे नाव- शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)


अधिसूचना जारी झालेली तारीख- 19 फेब्रुवारी 2024


अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया- 24 फेब्रुवारी 2024


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख- 10 मार्च 2024


रिक्त पदांची संख्या-254


अधिकृत वेबसाइट- https://www.joinindiannavy.gov.in


 Indian Navy Recruitment 2024: कोणती पदे रिक्त


- जनरल सर्विस - 50 पदे (पुरुष/महिला) (महिलांसाठी जास्तीत जास्त १५ पदे)


- पायलट, एयर ट्रैफिक, नेवल एयर ऑपरेशन - 46 पदे 


- लोजिस्टिक्स- 30 पदे


- नवल अमेडमेंट - 10 पदे


- एजुकेशन - 18 पदे


- इंजीनियरिंग ब्रांच -30 पदे


- इलेक्ट्रिक ब्रांच - 50 पदे


- नवल कंस्ट्रक्टर -20 पदे


Indian Navy Recruitment 2024 उमेदवारांची पात्रता


नेव्हीमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्डातून 60 टक्क्याहून अधि अंकानी पदवीधर असणे गरजेचे आहे. या भरतीसंदर्भातील अधिक तपशील तु्म्ही अधिसूचनेत पाहू शकता. 


Indian Navy Recruitment 2024 साठी अर्ज कसा कराल?


नेव्ही एसएससी अधिकारी पदांसाठी अर्ज करण्यासाठी या नियमांचे पालन करा. 


पहिला टप्पा- नौदलाची वेबसाइट  join Indiannavy.gov.in जा


दुसरा टप्पा- वेबसाइटवर दिलेल्या अर्ज भरा यावर क्लिक करा


तिसरा टप्पा- अर्ज भरण्यास सुरुवात करा


चौथा टप्पा- आवश्यक कागदपत्रे जोडा


पाचवा टप्पा- अर्जासाठी आवश्यक असलेले शुल्क भरा. 


सहावा टप्पा- अर्जाची एक प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवा