नवी दिल्ली : भारतीय नौसेनेचे आयएनएसव्ही तारिणीने विश्वभ्रमंतीसाठी निघालेल्या महिलांनी सर्वात कठीण केप होर्न शुक्रवारी सकाळी पार केला. या जहाजाचे सर्व क्रु मेंबर्स महिला आहेत. भारतीय नौसेनेचे प्रवक्ता कॅप्टन डी. के. शर्मा यांनी सांगितले की, जहाजाने सकाळी ६ वाजता दक्षिण बिंदूवरील केप होर्न पार केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चालक दलाने या विजयाचे प्रतीक म्हणून जहाजावरून तिरंगा फडकवला. ७० किलोमीटर ताशी वेगाने हवा वाहत असताना देखील जहाजाने तो बिंदू अगदी व्यवस्थित पार केला.



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून या कामगिरीबद्दल महिला नौसेनिकांचे अभिनंदन केले. त्यात त्यांनी म्हटले की, आयएनएसव्ही तारिणीने केप होर्न पार केल्याने खूप आनंद झाला. महिलांच्या या कामगिरीबद्दल गर्व आहे.



लेफ्टिनेंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टिनेंट कमांडर प्रतिभा जामवाल, पी. स्वाती, लेफ्टिनेंट एस. विजया देवी, बी. एश्वर्या आणि पायल गुप्ता या नौसेनेच्या महिला सप्टेंबर २०१७ ला समुद्रमार्गे विश्व भ्रमंतीसाठी निघाल्या होत्या.