मुंबई : आता तुम्हाला घरबसल्या पेट्रोल-डिझेल मिळेल, असे कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण आयओसीने पुण्यात डिझेलची होम डिलिव्हरी सुरु केली आहे. सुरुवातील फक्त डिझेलची डिलिव्हरी करणाऱ्या या कंपनीने त्यानंतर पेट्रोलची होम डिलिव्हरीही सुरु केली. त्यामुळे तुम्हाला आता पेट्रोल पंपावर जावून रांग लावण्याची गरज नाही. देशातील सर्वात मोठ्या ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसी (इंडियन ऑईल कॉर्पोरेशन) ने ही नवी सर्व्हिस सुरु केली आहे. कंपनी आता घरोघरी जावून फ्रीमध्ये डिलिव्हरी करेल.


या शहरात सुरु झाली सेवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IOC चेअरमॅन संजीव सिंह यांनी सांगितले की, कंपनीने या सेवेची सुरुवात पुण्यापासून केली. आता ही सेवा संपूर्ण देशभरात लागू करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कंपनीने ही सेवा २० मार्च २०१८ पासून सुरु केली. यासाठी कंपनीने डिझेल भरणारी मशिन एका ट्रकमध्ये फिट केली आहे. पेट्रोलपंपवर असणाऱ्या मशिनप्रमाणेच ही मशिन आहे. ट्रकमध्ये एक टाकी देखील आहे. यातूनच शहरात डिझेलची फ्री होम डिलिव्हरी केली जात आहे.
पेट्रोलची होम डिलिव्हरी लवकरच सुरु केली जाईल. IOC प्रमाणे इतर कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड (HPCL) आणि भारत पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड (BPCL)देखील होम डिलिव्हरीसाठी पैशांची मंजूरी मिळाली आहे. या कंपन्या देशातील अन्य भागात पायलट प्रोजेक्ट चालवतील. पहिल्यांदा डिझेल आणि त्याच्या यशस्वी टेस्टिंगनंतर पेट्रोलची डिलिव्हरी सुरू केली जाईल.


अशी सेवा प्रदान करणारी पहिली कंपनी


पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटनेकडून पैशांची मंजूरी मिळाल्यानंतर अशाप्रकारची सेवा सुरू करणारी IOC ही पहिली कंपनी आहे. सध्या प्रायोगिक आधारावर ही सेवा सुरु करण्यात आली आहे. तीन महिन्याच्या टेस्टिंग कालावधीनंतर जो अनुभव किंवा प्रतिसाद मिळेल त्यानुसार ही सेवा इतर शहारांमध्ये सुरु करण्यात येईल, असे IOC चेअरमॅन संजीव सिंह म्हणाले.



प्रेट्रोलियम सेक्टरमध्येही तंत्रज्ञानाचा वापर 


इंडियन ऑईल कॉरपोरेशनने काही दिवसांपूर्वी याची माहिती ट्विटरवर शेअर केली आहे. IOC नुसार, मोबाईल डिस्पेंसर ही घरोघरी डिझेल पोहचवणारी पहिली मशिन असेल. ग्राहकांच्या समस्या लक्षात घेवून हे पाऊल उचलण्यात आले आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या सेवेबद्दल माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, आयटी आणि टेलिकॉमप्रमाणे प्रेट्रोलियम सेक्टरमध्येही तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल आणि लवकरच पेट्रोल डिझेलची होम डिलिव्हरी करण्यात येईल.