भारतात महिलांनी त्यांच्या मेहनतीने आणि इच्छाशक्तीने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण संसदेत मात्र महिलांचे प्रतिनिधित्व फार कमी असल्याचे दिसत आहे.  संसदेत फक्त 12 टक्के महिला उमेदवार आहेत. संयुक्त राष्ट्राच्या मंचावर भरताने ही माहिती दिली. 90 कोटींची लोकसंख्या असलेल्या भारतात मतदार वर्ग आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरूवारी भारतीय संयुक्त राष्ट्राचे उप स्थायी प्रतिनिधी राजदूत नागराज नायडू यांनी सांगितले की, भारतीय संविधानाच्या 73व्या ऐतिहासिक संशोधानंतर ग्रामीण, जिल्हा, पातळीवरील संस्थांसह सर्व तालुकांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण निश्चित केले आहे.


भारतीय राजनीतिमध्ये फक्त 14 लाख निवडक महिला प्रतिनिधी आहेत. त्यांपैकी एकूण निर्वाचित प्रतिनिधी 44 टक्के महिला आहेत तर भारतातील गावांमध्ये निवडलेल्या महिलांची टक्केवारी एकूण 43 टक्के आहे. 


मागील निवडणुकींमध्ये फक्त 12 टक्के महिला सक्रिय असल्याचे राजदूत नागराज नायडू यांचे म्हणणे आहे. 'राष्ट्रीय पातळीवर महिला अग्रेसर असल्या तरीही राष्ट्रीय संसदेत त्यांचे प्रतिनिधित्व मात्र निराशजनक आहे.'