Indian Railway Accident Insurance Rules : भारतात ट्रेननं प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. कारण ट्रेननं प्रवास करणं हे खूप सुरक्षित, स्वस्त आणि आरामदायक वाटतं. त्यामुळे अनेक लोक देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वेची निवड करतात. भारतीय रेल्वेनं ट्रेननं प्रवास करणाऱ्यांच्यासाठी काही नियम तयार केले आहेत. जेणे करून ट्रेननं प्रवास करताना प्रवाशाला कोणत्याही अनपेक्षित गोष्टीचा सामना करावा लागणार नाही. रेल्वेशी संबंधीत नियमांविषयी अनेकांना माहिती देखील नसते. त्यामुळे अनेक प्रश्नांसोबत एक प्रश्न आहे तो म्हणजे रेल्वेनं प्रवास करताना प्रवाशाला काही झालं तर? अनेकदा लोकांना प्रश्न असतात की जर ट्रेनचा अपघातात नाही, तर कोणत्या व्यक्तीचा ट्रेननं प्रवास करताना निधन झालं तर त्या व्यक्तीला भरपाई दिली जाते का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा प्रवाशांसमोर प्रश्न उपस्थित राहतो की कोणत्या व्यक्तीचं ट्रेननं प्रवास करताना निधन झालं तर त्याला काही भरपाई मिळते का? जर तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर चला त्याविषयी आज सविस्तर जाणून घेऊया.


भारतीय रेल्वे वाहतूक विभागाच्या नियमांनुसार, जर ट्रेनमध्ये कोणत्या व्यक्तीच्या निधनाचं कारण हे रेल्वे असते, तर भारतीय रेल्वे त्याला भरपाई देते. पण जर कोणत्या आजारामुळे किंवा दुसऱ्या काही कारणांमुळे त्यांचं निधन झालं तर भारतीय रेल्वे त्याला काही भरपाई देत नाही. 


अनेकदा भारतीय रेल्वेमध्ये अनेक प्रवाशांचा अपघात अनेकदा चढताना किंवा उतरताना होतो. अनेकांचं निधन हे ट्रेनच्या खाली चिरडल्यानं होतं. तर अनेकांना गंभीर दुखापत होते. अशा परिस्थितीत जर चूक ही प्रवाशाची असेल तर त्यांना भरपाई मिळत नाही. पण जर ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना कोणत्या प्रवाशाच्या निधनाचं कारण रेल्वे असली तर त्यांना भरपाई मिळते. 


अनेदा असं पाहण्यात आलं आहे की अनेक लोक हे ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. जेणे करून अनेक लोकांचं निधन होतं आणि अनेक लोकांना गंभीर दुखापत देखील होते. आत्महत्या करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई मिळत नाही. 


किती भरपाई मिळते? 


IRCTC रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनां 35 पैशांसाठी जवळपास शून्य प्रीमियमवर 10 लाख रुपयांचा वीमा मिळतो. हा वीमा प्रवाशांसाठी सगळ्यात स्वस्त असतो. IRCTC या अ‍ॅप किंवा वेबसाइटच्या मदतीनं तिकीट बूक केलं तर पेमेंट प्रोसेस दरम्यान, इंशॉरन्सचा पर्याय देण्यात येतो. त्या पर्यायाला सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला 35 पैशांमध्ये वीमा कव्हर करून मिळतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की PNR नं जितक्या लोकांचं तिकिट बूक होतं त्या सगळ्यांना हा इंशोरन्स लागू होतो.