रेल्वेतून विना तिकिट प्रवास करताय, सावधान... 1 एप्रिलपासून `सा` वसूल करणार दंड
Railway QR Payment: रेल्वेने प्रवास करताना तिकिट काढणं बंधनकारक असतं. विनातिकिट प्रवास केल्यास आर्थिक दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते. पण यानंतरही अनेकजण विनातिकिट प्रवास करतात. अशा फुकट्या प्रवाशांवर आता कारवाई करण्याचे नियम बदलले आहेत.
Railway QR Payment: तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रेल्वेने प्रवास करताना काही नियम पाळणं बंधनकारक आहे. यात विना तिकिट प्रवास, रेल्वे रुळ ओलांडणं किंवा रेल्वेच्या दाराजवळ उभं राहून प्रवास करणं गुन्हा आहे. रेल्वेचे हे नियम मोडल्यास प्रवाशाकडून दंड आकारला जातो. यात आर्थिक दंड आणि तुरुंगवासाची तरतूद आहे. पण आता 1 एप्रिलपासून दंड वसूल करण्याची पद्धत बदलण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) यासाठी नवी पद्धत सुरु केली आहे.
दंड वसूल करण्याची नवी पद्धत
देशात डिजिटल व्यवहार (Digital Payment) मोठ्याप्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे खिशात रोख रक्कम ठेवण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. भारतीय रेल्वेनेही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत फुकट्या प्रवाशांकडून दंड आकारण्याची पद्धत सुरु केली आहे. रेल्वेतून विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आता क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करून दंड वसूल केला जाणार आहे. लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये अनेक जण जनरल तिकिटांवर एसी किंवा स्लिपर डब्यातून प्रवास करतात. अशा प्रवाशांना टीसीने पकडल्यानंतर खिशात पैसे नसल्याचं कारण देतात. पण आता अशा प्रवाशांकडूनही डिजिटल वसूल केली जाणार आहे.
यासाठी तिकिट तपासणीसांना यासाठी हेड हेल्ड टर्मिनल मशीन (Hand Held Terminal) दिल्या जाणार आहेत. या मशीनद्वारे डिजिटलपद्धतीने प्रवाशांना पैसे भरता येणार आहे.
QR कोडने भरता येणार पैसे
भारतीय रेल्वे बदलत्या काळानुसार बदल करत आहे. याचाच एक भाग म्हणजे डिजिटल पेमेंट. प्रवासादरम्यान तिकिटाविना पकडलं गेल्यास, प्रवासी डिजिटल पेमेंट करून तुरुंगात जाणे टाळू शकतो. यासाठी भारतीय रेल्वेकडून तिकीट तपासनीसांना हँडहोल्ड टर्मिनल मशीन पुरवल्या जाणार आहेत. देशभरातील अनेक रेल्वे स्थानकांवर या मशीन पोहोचल्या आहेत. तर चालत्या ट्रेनमध्ये ड्युटी करणाऱ्या टीसींनाही या मशीन दिल्या जाणार आहेत. या मशीनमधला QR कोड मोबाईलद्वारे स्कॅन करुन पैसे भरता येणार आहेत. प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे.
तिकिट तपासणीस दंड वसूल करण्यासाठी आपल्या हेड हेल्ड टर्मिनल मशीनमध्ये त्या प्रवाशाची पूर्ण माहित भरेल. त्यानंतर QR कोड जनरेट होईल. प्रवासी आपल्या मोबाईलद्वारे तो क्यूआरकोड स्कॅन करुन पेमेंट करु शकतो. यामुळे व्यवहारात पारदर्शीपणा राहिल. यामुळे पैसे घेत असल्याच्या आरोपातून टीसीही वाचणार आहेत.