Vande Bharat Metro News: वंदे भारत एक्स्प्रेसनंर देशाला आता पहिली वंदे मेट्रो (Vande Bharat Metro) मिळणार आहे. पंतप्रधान मोदी गुजरातमधून वंदे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. भूज ते अहमदाबाददरम्यान देशातील पहिली वंदे मेट्रो धावणार आहे. पण उद्घाटना आधीच भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. पहिल्या वंदे मेट्रोचं नाव बदण्यात आलं आहे. 'वंदे मेट्रो' आता 'नमो भारत रॅपिड रेल' (Namo Bharat Rapid Rail) या नावाने ओळखली जाणार आहे. याआधी RRTS चं नाव RapidX बदलून नमो भारत असं करण्या आलं होतं. आता वंदे मेट्रोचे नाव बदलण्यात आलं आहे. पीएमो मोदी उद्घाटनानंतर वंदे मेट्रोतून प्रवास करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसा आहे वंदे मेट्रोचा मार्ग


पीएम मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवली जाणार वंदे मेट्रो कोल्हापुर-पुणे, पुणे-हुबळी, नागपूर-सिकंदराबाद, आगरा कैंट ते बनारस आणि दुर्ग ते विशाखापट्टनम अशा अनेक मार्गांवर चालणार आहे. वंदे मेट्रोचा पहिला टप्पा अहमदाबाद ते भूज असा आहे.


पहिल्या वंदे मेट्रोचा मार्ग


देशातल्या पहिल्य नमो भारत रॅपिड रेलचा मार्ग भूज ते अहमदाबाद दरम्यान असणार आहे. आठवड्यातील सहा दिवस म्हणजे सोमवार ते शनिवार ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. भूज ते अहमदाबाददरम्यान दहा स्थानकांवर मेट्रो थांबेल. यात अंजार, गांधीधाम, भचाऊ, समखियाली, हलवद, ध्रांगध्रा, विरमगाम, चांदलोडिया आणि साबरमती या स्थानकांचा समावेश असेल.


काय असणार नमो भारत रॅपिड ट्रेनची वेळ


भूज ते अहमदाबाद दरम्यानचा नमो भारत रॅपिड ट्रेनचा प्रवास 5 तास 45 मिनिटांचा असणार आहे. ही मेट्रो सकाळी 5.05 वाजता भूजवरुन रवाना होईल आणि 10.50 वाजता अहमदाबादमध्ये पोहोचेल. तर अहमदाबादमधून संध्याकाळी 5.30 वाजता सुटेल आणि रात्री 11.00 वाजता भूजवमध्ये दाखल होईल.


किती असणार तिकिट?


नमो भारत रॅपिड रेलला 12 डब्बे असणार आहेत. या ट्रेनची प्रवासी क्षमता 1,150 इतकी आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर 17 सप्टेंबरपासून मेट्रोच्या नियमित प्रवासाला सुरुवात होईल. अहमदाबाद ते भूजदरम्यानचं तिकिट 455 रुपये इतकं आहे. नमो भारत रॅपिड रेलचा वेग 110 किमी प्रति तास इतका असणार आहे. 359 किलो मीटरचं अंतर कापायला या ट्रेनला 5 तास 49 मिनिटांचा वेळ लागणार आहे.