नवी दिल्ली : मार्च २०१९ पर्यंत सर्व ट्रेनमध्ये बायो टॉयलेट लावण्याची योजना आखली जात आहे. रेल्वेतर्फे सर्व ट्रेनमध्ये बायो टॉयलेट लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 
  
रेल्वे कार्यशाळेत रेल्वेचे नवे डबे तयार करताना किंवा डागडुजी करताना यापूढे बायो टॉयलेट आणले जावे असे रेल्वे राज्यमंत्री राजोन गोहेन यांनी  लोकसभेत सांगितले. 


'स्वच्छ भारत'च्या दिशेने 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ५५ टक्के प्रवासी कोच बायो टोयलेट सुविधेत आणल्याचेही यावेळी सांगण्यात आले.  बायो टॉयलेट हे 'स्वच्छ भारत'च्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. 


असे काम करते बायो टॉयलेट ?


  शौचालयाखाली बायो डायझेस्टर कंटेनरमध्ये एनरॉबिक बॅक्टेरीया असतात जे मानवी मळाला पाणी आणि गॅस मध्ये रुपांतरीत करतात. 


  हे गॅस वातावरणात सोडले जातात. दूषित पाणी क्लोरिनेशन नंतर ट्रॅकवर सोडले जाते. 


  रेल्वे आणि डिफेंस रिसर्च अॅण्ड डेव्हसपमेंट ऑर्गनायजेशन (डीआरडीओ) मार्फत संयुक्त रुपात 'बायो टॉयलेट' चालविले जात आहे.