Indian Railway RRB JE Vacancy 2024 : भारतीय रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न तुम्ही बाळगून असाल तर आता तुमचं हे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वे तुमच्यासाठी खुशखबर घेऊन आलं आहे. भारतीय रेल्वेत ज्युनिअर इंजिनिअरसाठी मेगाभरती केली जाणार आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून (Railway Recruitment Board) रेल्वेच्या विविध झोनमध्ये ज्युनिअर इंजिनिअरची पदं भरली जाणार आहेत. या भरतीप्रक्रियेसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पाहूयात या भरतीसंदर्भात संपूर्ण माहिती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भरतीचा तपशील
रेल्वे भर्ती बोर्डाने एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये रोजगार सूचना प्रकाशित केली असून (CEN) क्रमांक 03/2024 नुसार, कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट, केमिकल पर्यवेक्षक (संशोधन पर्यवेक्षक) अशा एकूण 7951 पदांसाठी भरती केली जाणार आहे.


कधी अर्ज करता येणार?
रेल्वे भरती बोर्ड ज्युनिअर इंजिनिअर भरतीसाठी 30 जुलै 2024 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. यानंतर उमेदवार 29 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतील.


किती असेल अर्जाची फि
रेल्वे भरती बोर्ड ज्युनिअर इंजिनिअर भरती 2024 साठी 500 रुपये अर्ज शुल्क अदा भरावं लागणार आहे.  एससी, एसटी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्व महिला उमेदवारांसाठी हे शुल्क 250 रुपये इतके असणार आहे.  निवड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील CBT मध्ये उमेदवारांचं नाव असेल त्यांना बँक फी कमी केल्यानंतर परीक्षा शुल्क परत करण्यात येईल असंही सूचित करण्यात आलं आहे. 


कसा कराल अर्ज
या भरतीसाठी उमेदवारांना रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर दिल्या जाणाऱ्या अॅप्लिकेशन पेजवर अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होताच तपशीलवार भरती अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारांनी भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करावा.


इस भर्ती से लिए कैंडिडेट्स को अपने क्षेत्र से संबंधित रेलवे भर्ती बोर्ड जोन की ऑफिशइयल वेबसाइट पर एक्टिव किए जाने वाले लिंक के जरिए एप्लीकेशन पेज पर जाकर आवेदन करना होगा. आवेदन प्रक्रिया शुरू होने के साथ ही डिटेल्ट भर्ती नोटिफिकेशन जारी कर दिया जाएगा. उम्मीदवारों को भर्ती नोटिफिकेशन अच्छी तरह पढ़ने के बाद ही आवेदन करना चाहिए.