नवी दिल्ली : प्रवाशांची सुरक्षा आणि हिताचा विचार करून रेल्वे नेहमीच वेगवेगळ्या सुविधा सुरु करतं. रेल्वे प्रशासन आता प्रवाशांसाठी नवीन डिस्काऊंट ऑफर घेऊन आलं आहे. १० टक्क्यांपासून ते ५० टक्क्यांपर्यंत हा डिस्काऊंट मिळणार आहे. रेल्वेनं डायनामिक प्रायसिंग मॉडेलच्या माध्यमातून प्रवाशांना हा डिस्काऊंट मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या वर्षी रेल्वेनं काही प्रिमियम ट्रेनसाठी अशाप्रकारचं फ्लेक्सी फेयर मॉडेल तयार केलं होतं. या मॉडेलनुसार जसजशी रिजर्व्हेशनची तारीख जवळ येईल, तसं रेल्वे तिकीट वाढत जाईल. म्हणजेच तिकीट लवकर बूक केलं तर ग्राहकांना भरघोस डिस्काऊंट मिळणार आहे. या योजनेमुळे रेल्वेच्या महसुलामध्ये वाढ झाली होती. पश्चिम रेल्वेनं या योजनेमुळे ५४ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल गोळा केला.


सुपर प्रिमियम ट्रेनमध्ये पीक सिझनच्यावेळी पहिल्या १० टक्के तिकीटांच्या किंमती तेवढ्याच राहतील. पुढच्या १० टक्के तिकीटांसाठी १० टक्के जास्त किंमत आकारण्यात येईल. पण प्रवासाच्या दोन दिवस आधी ट्रेनमध्ये ५० टक्के तिकीटं विकली गेली नसतील तर प्रत्येक १२ तासांमध्ये तिकीटाचे पैसे कमी होत जातील. रिजर्व्हेशन चार्ट लागेपर्यंत हा डिस्काऊंट सुरु राहिल. चार्ट लागल्यानंतर ट्रेन सुरु झाल्यावरही तिकीटं विकली गेली नाहीत तर १० टक्के डिस्काऊंट देण्यात येईल.