मुंबई : रेल्वेचे वेगवेगळे नियम बनत असतात, तर काही नियम बदलत असतात. त्यामुळे लोकांच्या मनात याबद्दल खूप संभ्रम आहे. त्यामुळे लोकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची समाधान कारक उत्तरे मिळत नाहीत, रेल्वे तिकिट कधी पर्यंत कॅन्सल करु शकतो. किंवा त्याचे किती टक्के आपल्या रिफंड मिळतील? आपण कधी रिफंडसाठी क्लेम करु शकतो? या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.


रिफंड नियम काय आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला जितक्या लवकर शक्य आहे, तितक्या लवकर तिकिट कॅन्सल करा.  कारण तिकिट कॅन्सल करायला तुम्हाला जितका वेळ लागेल तितका कॅन्सलेशन चार्ज त्याच्यावर वाढत जाईल. काही वेळेला जास्त वेळ वाया गेला, तर तुमच्या हातात काहीच फी येणार नाही.


ऑनलाईन-ऑफलाईनचे नियम वेगळे


तुम्ही जर ऑनलाईन तिकिट काढलीत आणि जर शेवटता चार्ट बनेपर्यंत तुमची तिकिट वेटींग लिस्टमध्ये असेल तर तुमची तिकिट स्वत:हून कॅन्सल होईल. त्याचा रिफंड तुम्हाला दोन ते तीन दिवसात मिळेल.


तुम्ही जर तिकिट खिडकीवरुन तिकिट काढली असाल तर ती कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला खिडकीवर जाऊनच ती कॅन्सल करावी लागणार आहे.


कन्फर्म तिकिट कॅन्सल केले तर किती चार्ज भरावा लागणार?


AC फर्स्ट  आणि एग्जिक्यूटिव क्लाससाठी 240 रुपये
AC सेकंड आणि फर्स्ट क्लाससाठी 200 रुपये
थर्ड AC, इकॉनॉमी आणि चेअरकारसाठी 180 रुपये
स्लीपर 120 रुपये
सेकंड क्लास सीटिंग 60 रुपये
ट्रेन सुटण्यापूर्वी 48 तास ते 12 तासांपर्यंत 25% कॅन्सलेशन चार्ज घेतले जाईल
ट्रेन सुटण्यापूर्वी 12 तास ते 4 तासांपर्यंत 50% कॅन्सलेशन चार्ज घेतले जाईल
चार्ट तयार केल्यानंतर आणि ट्रेन सुटण्याच्या दरम्यान काहीच रिफंड मिळणार नाही


वेटिंग आणि  RAC कॅन्सलेशन


काउंटरवरुन खरेदी केलेले वेटिंग किंवा RAC तिकिट रद्द करण्यासाठी ट्रेन सुटण्याच्या अर्धा तासापूर्वी तिकिट रद्द करावे लागेल. यासाठी तुम्हाला काउंटरवरच जावे लागेल. ट्रेन सुटल्यानंतर कोणतेही रिफंड मिळणार नाही.
ऑनलाईन तिकिट घेतल्यावर वेटिंगमध्ये खात्यात पैसे आपोआप परत केले जातात. त्याचबरोबर RACरद्द केल्यानंतरही खात्यात पैसे येतील.


तत्काळ तिकीट कॅन्सल केल्यानंतर काहीच रिफंड मिळत नाही. परंतु काही केसेसमध्ये रेल्वेने ही रक्कम देण्याची व्यवस्था केली आहे.


ज्या स्थानकावरुन ट्रेनचा प्रवास सुरु होतो, त्या स्थानकावरुन ट्रेनला सुटायला तीन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास रिफंड मिळण्याचा दावा केला जाऊ शकतो. यासाठी प्रवाशाला टीडीआर-तिकिट ठेव पावती घ्यावी लागेल. त्यानंतर 16 ते 90 दिवसांच्या आत पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातील. ही रक्कम परत करताना रेल्वे फक्त क्लेरिकल शुल्क वजा करते.


जर रेल्वेचा मार्ग बदलला असेल आणि प्रवाशाला त्या मार्गावर प्रवास करायचा नसेल, तर तिकीट रद्द करून रिफंडचा दावा केला जाऊ शकतो.


जर ट्रेनचा मार्ग बदलला असेल आणि त्या मार्गावर प्रवाशांचे बोर्डिंग स्टेशन आणि गंतव्य स्थानक नसेल तर रिफंडचा दावा केला जाऊ शकतो.


जर रेल्वे रिझर्वेशन प्रवर्गापेक्षा खालच्या वर्गात जागा उपलब्ध करून दिली असेल, तर प्रवासी रिफंडचा दावा करु शकतात.