IRCTC Ricket Reservation : रेल्वेनं प्रवास करण्याला जवळपास प्रत्येक भारतीयाचं प्राधान्य असतं. अर्थात काही मंडळी इथं अपवाद ठरतात, कारण त्यांचं प्राधान्य हे विमान प्रवासाला असतं. पण, निम्मा भारत रेल्वेनंच प्रवास करतो असं म्हणणं गैर ठरणार नाही. कधी ना कधी हा रेल्वे प्रवासाचा योग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो. त्यातही काहींसाठी हा रेल्वेप्रवास म्हणजे असंख्य आठवणी देऊन जाणारा एक टप्पा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामाच्या निमित्तानं असो किंवा मग आपल्या मूल गावी परतणं असो, रेल्वे प्रवास कैक कारणांनी, कैक शहरं आणि राज्यांमध्ये केला जातो. सणासुदीच्या दिवसांमध्ये रेल्वे प्रवासादरम्यान अनेकांचीच तारांबळ उडते. कारण ठरतं ते म्हणजे तिकीटासाठी असणाऱ्या Waiting List. रेल्वेचं तिकीट कन्फर्म होत नाही, तोवर प्रवास करणं जोखमीचं असतं. त्यामुळं अनेकांचेच डोळे तिकीट Confirm होण्याकडे लागलेले असतात. अनेकांच्याच मते तिकीट काढताक्षणी ते कन्फक्म होईल की नाही हे लक्षातच येत नाही. 


प्रत्यक्षात मात्र तसं नाहीय. कारण, रेल्वे तिकीटावर असे काही कोड असतात ज्या माध्यमातून तुमची तिकीट कन्फर्म होणार आहे की नाही? हे जवळपास लक्षातच येतं. रेल्वे तिकीटावर असणाऱ्या Code कडे अनेकदा आपलं लक्ष जात नाही, पण त्या कोडमागे अनेक अर्थही दडलेले असतात हे तुम्हाला माहितीये? 


हेसुद्धा वाचा : अध्यात्मिक गुरु जया किशोरी वादाच्या भोवऱ्यात; 2 लाखांची बॅग अन् एअरपोर्ट लूक पाहून नेटकरी हडबडले


वेटींग लिस्टच्या तिकीटांवरील कोड आणि त्यांचे अर्थ... 


वेटिंगच्या तिकीटावर PQWL लिहिलेलं असल्यास त्याचा अर्थ होतो, 'पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट'. हा कोड असल्यास वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता कमी असते. 
तिकीटावर GNWL लिहिलेलं असल्यास त्याचा अर्थ असतो जनरल वेटिंग लिस्ट. हा कोड असल्यास तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता अधिक असते. 
तिकीट RLWL या कोडसह असल्यास त्याचा अर्थ आहे, रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट. असा कोड तिकीटावर असल्यास तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता अतिशय कमी असते. 
TQWL या कोडसह तिकीट मिळाल्यास याचा अर्थ असतं, तत्काल कोटा वेटिंग लिस्ट. असा कोड दिसल्यास तिकीट कन्फर्म होण्याची कमी असते. हे तिकीट जेव्हा कन्फर्म होतं, तेव्हा तत्काल कोट्यातून बुक केलेली तिकीटं रद्द केली जातात.